Ready Reckoner Rate : महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर जमिनीची खरेदी विक्री केली जाते. शेतजमिनीचा किंवा इतर जमिनीचा भाव ठरवत असताना आपल्याला काही गोष्टींचा आढावा घ्यावा लागतो. जशाप्रकारे भौगोलिक स्थितीनुसार त्याठिकाणच्या जमिनीचा दर किती आहे ? सध्यास्थितीत चालू असलेला जमिनीचा दर इत्यादी. पण यासोबतच आपल्याला शासनाकडून ठरविण्यात आलेल्या Ready Reckoner Rate नुसार जमिनीची किंमत घरबसल्या ऑनलाईन पाहता येते. याबद्दलची थोडक्यात पण कामाची माहिती आपण याठिकाणी पाहणार आहोत.
रेडीरेकनर दर म्हणजे काय ? Ready Reckoner Rate
जमीन खरेदी विक्री करत असताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीचा रेडी रेकनर दर, तुम्हाला जर रेडीरेकनर दर काय आहे ?यासंदर्भात अधिकची माहिती नसेल, तर रेडी रेकनर दर हा शासनाकडून उपनिबंधक कार्यालयाद्वारे अधिसूचित केलेल्या मालमत्तेच्या व्यवहाराचा किमान दर असतो. काही राज्यांमध्ये रेडी रेकनर दराला सर्कल रेट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. महाराष्ट्रामध्ये रेडी रेकनर दरापेक्षा कमी किमतीत मालमत्ता विकणे जवळजवळ अशक्य आहे.
याठिकाणी आपण शासनाकडून निश्चित करण्यात आलेले दर नेमके कसे पाहायचे ? याचा जनसामान्य नागरिकाच्या जीवनाशी काय संबंध आहे ? रेडी रेकनरचे दर नेमकं कोण ठरवतं? महाराष्ट्रातील रेडीरेकनर दर ऑनलाईन कसे पहावेत याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
जमिनीचे रेडीरेकनर दर कोण ठरवतात?
महाराष्ट्र राज्यामध्ये सामान्यता महसूल विभागाकडून राज्यातील विविध जमिनीचे रेडीरेकनर दर ठरविण्यात येतात. अनेकांना प्रश्न पडलेला असेल कोणत्या मूलभूत तत्वाच्या आधारावर दर ठरविण्यात येतात.
- महाराष्ट्र महसूल विभागामार्फत राज्यातील जमिनीचे व मालमत्तेचे रेडी रेकनर दर ठरविण्यात येतात.
- प्रत्येक जमिनीचा एक जुना इतिहास असतो. तो इतिहास जाणून घेऊन त्यावर शुल्क ठरवले जातात.
- एखाद्या जमिनीतून शासकीय प्रकल्प जाणार असेल, तर अशा परिस्थितीत त्या जमिनीच्या रेडीरेकनरच्या दरापेक्षाही जास्त किमतीने ज्यांच्या त्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना पैसे दिले जातात.
- ज्यांच्या जमिनी शासकीय प्रकल्पामध्ये गेल्या असतील, त्यांना कोणत्याही प्रकारचा नुकसान होऊ नये, यामुळे शासनामार्फत हा नियम सुरू करण्यात आलेला आहे.
- प्रकल्पग्रस्तावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी प्रकल्पग्रस्तांना रेडी रेडीरेकनरच्या दुप्पट तिप्पट दर दिला जातो. कारण शासकीय प्रकल्प किंवा राष्ट्रीय महामार्ग जमिनीतून गेल्यानंतर त्या जमिनीचे दर वाढणार असतात.
Ready Reckoner Rate आँनलाईन असा तपासा !
- महाराष्ट्र शासन नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून जनसामान्य नागरिकांना जमिनीचा रेडी रेकनर दर तपासण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
- सर्वप्रथम शासन नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे क्लिक करा
- ऑनलाईन सेवा यादीमध्ये EASR या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्राचा नकाशा उघडेल.
- दिसत असलेल्या नकाशामध्ये तुम्हाला ज्या शहराचा रेडी रेकनर दर तपासायचा असेल, त्या शहराच्या नावावर क्लिक करा.
- त्यानंतर ड्रॉप डाऊन पर्यायातील तुमचा तालुका आणि गाव निवडून घ्या.
- या पद्धतीने तुम्हाला घरबसल्या तुमच्या मोबाईलवरती तुमच्या जमिनीचा रेडी रेकनर दर पाहता येईल.
महाराष्ट्र शासनाकडून जमिनीचे आणि मालमत्तेचे रेडी रेकनर दर पाहण्यासाठी नुकताच मोबाईल ॲपसुद्धा विकसित करण्यात आलेला आहे. आजच्या माध्यमातून सहज व सोप्या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर जमिनीचे रेडी रेकनर दर पाहता येतील. त्यासाठी मोबाईलमध्ये प्ले-स्टोरवरून Ready Reckoner Maharashtra App डाउनलोड करावा लागेल.
| जमिनीचा दर पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| रेडी रेकनर अँड्रॉइड अँप | येथे क्लिक करा |
Feeling lucky? aa888casino’s got you covered! I’ve had some pretty good wins there lately. The site’s easy to use, and the customer service is helpful. Definetly check it out, here is the link aa888casino!
Gave 33win8bet a try – pretty straightforward. Clean site and easy to figure out, good for beginners or anyone who wants no fuss gaming. Worth a look! Play now! 33win8bet