रमाई आवास घरकुल योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल  संबंधित विभागाकडून अर्जदारांना आवाहन

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील व्यक्तींना त्यांच्या बिकट परिस्थितीमुळे स्वतःच्या आर्थिक उत्पन्नातून चांगल्या प्रकारची  घरे बांधून राहणे शक्य होत नाही. शहरातील वाढत्या किमतीमुळे स्वतःचे घर त्यांना घेता येत नाही,त्या मुळे त्यांना पर्यायाने झोपडपट्टीत राहावे लागते.

रमाई आवास घरकुल योजना

ग्रामीण आणि शहरी भागातील अनुसूचित जाती यांनी नवबौद्ध घटकातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व निवाराचा कायमस्वरूपी प्रश्न मिटवण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून रमाई आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली.

रमाई आवास घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर देण्यात आले आहे. संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा सामाजि न्याय विभागाकडून निकष व अटी ठरवून देण्यात आलेले आहेत, त्याप्रमाणे अर्जदारांना पात्र असल्यास अर्ज करावा लागेल.

अतिरिक्त दाखले

रेशनकार्ड,निवडणूक मतदार ओळखपत्र,महानगरपालिका मालमत्ता कर/झोपडपट्टी निर्मुलन आणि पुनर्वसन विभागाकडील कर भरल्याची पावतीची प्रत

पात्रता

  • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध संवर्गातील असावा.
  • महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य 15 वर्षांचे असावे.
  • शासनाच्या अन्य कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा -मनपा क्षेत्राकरिता रक्कम 3 लाखपर्यंत असेल.
  • सदर योजनेचा लाभ पक्क्या घरावरील वरचा मजला बांधणेसाठी पात्र राहणार नाही.
  • अर्जदाराचे या अगोदर पक्के घर असेल, तर अर्जदार पात्र ठरणार नाही.

बांधकाम करतेवेळी आवश्यक परवानगी संबंधित क्षेत्रीय कार्यालय आणि समक्ष अधिकारी तथा उपआयुक्त(परिमंडळ) पुणे महानगरपालिका यांचेकडून घेणे बंधनकारक

रमाई आवास योजनेसाठी अर्जदारांनी 31/10/2024 पर्यंत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन उप आयुक्त, पुणे महानगरपालिका(समाजकल्याण विभाग) यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे.

अर्जदाराने सादर करावयाची कागदपत्रे

  • BPL प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला (SDO/तहसीलदार)/Validity Certificate
  • घर टॅक्स पावती अर्जदाराच्या नावाची
  • असेसमेंट कॉपी अर्जदाराच्या नावाची
  • रहिवाशी दाखला प्रभागीय अधिकारी मनपा झोनचा G) रहिवाशी दाखला नगरसेवकाचा
  • राशन कार्ड मध्ये नाव असणे आवश्यक
  • १०० रू .मुद्रांक पेपर वर प्रतिज्ञा लेख (टंकलिखीत)
  • आधारकार्ड किंवा वोटर कार्ड
  • विधवा असल्यास पतीचा मृत्यु दाखला
  • PR कार्ड
  • बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत (Joint A/C – नवरा-बायको)
  • पुरग्रस्त असल्यास दाखला
  • पिडीत असल्यास दाखला(Atrocity)
  • घरपट्टी,पाणीपट्टी किंवा विद्युतबिल या कागदपत्रांपैकी एक
  • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला

अर्ज कसा करावा ?

  • रमाबाई आवास घरकुल योजना(शहर) करिता अर्ज ramai-awas-yojana-form.pdf या ठिकाणी उपलब्ध आहे.
  • रमाबाई आवास घरकुल योजना(शहर) करिताचा अर्ज डाउनलोड करून रमाबाई आवास घरकुल योजना(शहर) करिता प्रमुख अटी आणि शर्ती आणि अर्जदाराने सादर करावयाची कागदपत्रांसह वरील पात्रतेत नमूद मान्य निकषानुसार पात्र असलेला आपला परिपूर्ण अर्ज आणि कागदपत्रे समाजकल्याण विभाग,दुसरा मजला,खोली क्रमांक -206,शिवाजीनगर,पुणे महानगरपालिका येथे दाखल करून पोहोच पावती घ्यावी.
  • क्षेत्रीय कार्यालयाकडून जागा पाहणीनंतर झोपडपट्टी पुनर्वसन विभाग आणि विकास विभागावरील अभिप्रायानंतर अर्ज मंजुरीसाठी रमाई आवास घरकुल योजना समितीसमोर सादर केले(Pune) जातील.

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️