Crop Insurance Sanctioned : प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीम बाबी अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिक विमा दिला जातो. पिकविमा कंपनीने “या” जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या 1 लाख 2 हजार 786 विमा पूर्वसूचना म्हणजेच दावे स्वीकारले आहेत.
पिक विमा नुकसान भरपाई
परभणी जिल्ह्यात 2023 च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या शेती पिकांच मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी, पूर इत्यादी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं होतं. पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती झाल्यानंतर संबंधित पिक विमा कंपनीकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या एकूण 1 लाख 2 हजार 786 पूर्व सूचना दाव्यांना संमती देण्यात आली आहे.
त्यापैकी 50 हजार 863 शेतकऱ्यांना 30 कोटी 55 लाख 11 हजार 858 इतकी नुकसान भरपाईची रक्कम विमापोटी मंजूर करण्यात आलेली आहे. परंतु अद्याप 51 हजार 923 शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये बहुतांश सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
एकूण पूर्वसूचना दाखल
परभणी जिल्ह्यात 2023 च्या पावसाळी मान्सूनमध्ये 27 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कापूस इत्यादी पिकांचं मोठं नुकसान झालं. प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता त्यांनी कॉल सेंटर, पिकविमा पोर्टल तसेच ऑफलाईन पद्धतीने एकूण एक लाख 93 हजार 967 पूर्वसूचना पिकविमा कंपनीकडे नोंदविल्या होत्या.
📢 नवीन पीककर्ज दर जाहीर ! पहा कोणत्या पिकाला किती दर मिळणार ?
यापैकी 1 लाख 2 हजार 876 पूर्वसूचना स्वीकारण्यात आल्या असून उर्वरित 91 हजार 181 पूर्वसूचना विविध कारणास्तव नाकारण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना डिसेंबर 2023 पर्यंत विमा भरपाई देणे आवश्यक होते; परंतु विमा कंपन्याकडून अद्याप उर्वरित काही शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई दिली नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राकडून देण्यात आली.
पिक विमा वाटप खालीलप्रमाणे
तालुका | शेतकरी संख्या | मंजूर रक्कम |
---|---|---|
परभणी | 3871 | 3.3255 |
जिंतूर | 11537 | 6.4336 |
सेलू | 9683 | 5.9578 |
मानवत | 3149 | 2.0438 |
पाथरी | 5083 | 3.5122 |
सोनपेठ | 2621 | 1.4804 |
गंगाखेड | 5857 | 3.4924 |
पालम | 7380 | 3.6826 |
पूर्णा | 1682 | 0.6225 |