28 फेब्रुवारी 2024 रोजी देशातील संपूर्ण पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा हप्ता त्यांच्या आधारस्त लग्न बँक खात्यात जमा करण्यात आला. जर एखाद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर संबंधित योजनेचे पैसे जमा झाले नसतील, तर अश्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं? PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे. तक्रार कोणत्या ठिकाणी करावी? याबद्दलची थोडक्यात पण कामाची माहिती आपण याठिकाणी पाहूयात.
PM किसान योजना हफ्ता मिळाला नाही
देशातील शेतकऱ्यांसाठी 28 फेब्रुवारी 2024 हा दिवस खूपच आनंदाचा ठरला; कारण यादिवशी शासनाकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात आला. देशातील जवळपास 9 कोटी शेतकरी कुटुंबांना 16व्या हप्त्याचा लाभ देण्यात आला. यादरम्यान एखाद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, तर अशा शेतकऱ्यांनी काय करावं? याबद्दलची माहिती पाहुयात.
या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता जमा झाला नाही, अश्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. यासोबतच शेतकऱ्यांनी आपल्या अर्जाची ऑनलाईन स्थिती तपासावी.
आपल्या बँक खात्याची स्थिती तपासावी. खात्यावर पैसे जमा झाल्याची स्थिती तपासावी, ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही मोबाईल ॲप किंवा वेबसाईटच्या माध्यमातून करू शकता. पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक 155261 वर संपर्क साधून तुम्ही तक्रार नोंदवू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदविण्याची सुविधासुद्धा शासनाकडून काही दिवसापूर्वी सुरू करण्यात आलेली आहे.
ऑनलाइन तक्रार कशी करावी?
- सर्वप्रथम तुम्हाला PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर Helpdesk – Quiry Form या पर्यायावर क्लिक करावे लागेल, एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल.
- त्या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.
- तक्रार नोंदवत असताना तक्रारीमध्ये संबंधित शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, बँक तपशील व मोबाईल क्रमांक इत्यादी बाबी समाविष्ट करा.
- तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला Know the Query Status या पर्यायावर क्लिक करून तुमच्या अर्जाची सध्या स्थिती पाहता येणार आहे.
- यासोबतच टोल फ्री क्रमांक 155261 किंवा 011-24300606 यावर ऑफलाईन पद्धतीने तक्रार नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांना 6000 रु. मिळाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ दौऱ्या दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता त्याच दिवशी वितरित करण्यात आला. अशी एकंदरीत शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची रक्कम एकाच दिवशी प्राप्त झाली आहे.
हफ्ता आला नाही, ऑनलाईन तक्रार नोंदवण्यासाठी येथे क्लिक करा