Crop Insurance : चालू वर्षातील जून व जुलै 2023 या कालावधीत राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान अतिवृष्टी व पुरामुळे झालं होतं. शेती पिकासोबतच शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचसुध्दा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी निधीवित्रीत करण्यात आलेला असून यासंदर्भातील शासन निर्णय (GR) नुकताच संबंधित विभागाकडून जाहीर करण्यात आलेला आहे.
नुकसान भरपाई यादी महाराष्ट्र 2023
नुकसान झालेल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाकडून तब्बल 1071 कोटी 77 लाख रु. इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ज्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळेल, अशा सर्व जिल्ह्यांची यादी आणि त्या संबंधित जिल्ह्याला मिळणारा निधी संदर्भातील शासन निर्णयात देण्यात आलेला आहे.
अतिवृष्टी किंवा पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांच नुकसान झाल्यास शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची तरतूद प्रधानमंत्री पिक विमा योजनेत करण्यात आलेली आहे. या तरतुदीला अनुसरून पुढील हंगामामध्ये उपयोगी पडेल असं निविष्ठा अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येतं.
1071 कोटी 77 लाख निधी
अमरावती, संभाजीनगर या जिल्ह्यात जून जुलै 2023 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्याचप्रमाणे पावसाचा प्रवाह जास्तीचा असल्याकारणाने शेतजमिनीचसुध्दा नुकसान झालं होतं. या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. शासनाकडून या सर्व बाबींचा विचार करून जमिनीच्या नुकसानीसाठी एकूण 11 कोटी 77 लाख इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
- अमरावती
- अकोला
- यवतमाळ
- बुलढाणा
- वाशिम
- जालना
- परभणी
- हिंगोली
- नांदेड
- बीड
- लातूर
तुम्ही वरीलपैकी 11 जिल्ह्यातील शेतकरी असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई अनुदानाची रक्कम म्हणजेच नुकसान भरपाई निधी जमा होणार आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही नुकसान भरपाई शासन निर्णय खालील लिंकवर क्लिक करून वाचू शकता.
👇👇👇👇👇👇
नवीन नुकसान भरपाई शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा