Insurance Scheme : राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना विविध योजना व सवलती देण्यात येतात. यावर्षी नव्यानं सुरुवात करण्यात आलेली 1 रुपयात पिक विमा योजना राज्यभरात खूपच प्रसिद्ध झाली आणि याचा फायदासुध्दा राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना झाला. याच धरतीवर आता शासनाकडून शेतकऱ्यांना पशु विमा दिला जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर पशुपालन केलं जातं. हीच बाब लक्षात घेता शासनाकडून ही विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे.
पशुधन विमा योजना महाराष्ट्र 2023
शेती व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांकडून शेतीसोबत आपल्या पशूंची म्हणजेच जनावरांची काळजी घेणंसुध्दा तितकंच महत्त्वाच आहे. त्यामुळे आता राज्यशासनाकडून जनावरांच्या सुरक्षिततेसाठी नवीन पशुविमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजनेनुसार शेतकऱ्यांना एका जनावराचा विमा उतरवण्यासाठी फक्त 3 रुपये मोजावे लागणार आहेत. सदर योजनेचा प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाकडून तयार केला जात असून लवकरच शेतकऱ्यांसाठी ही योजना अमलात येईल.
महाराष्ट्र राज्याचा 2019 चा पशुगणना आराखडा पाहिल्यास राज्यात 62 लाख दूभत्या गाई-म्हशी, 53 लाख बैल, 75 लाख शेळ्या आणि 28 लाख मेंढ्यांचा समावेश आहे. पशुधनाचे स्थूल मूल्य 93 हजार 169 कोटी रु. आहे. हाच पशुधन संवर्धित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून प्रस्ताव तयार केल्यानंतर मंजुरीसाठी लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. मंत्रिमंडळासमोर हा पशुधन विमा योजना प्रस्ताव मंजूर झाल्यास राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल.
पशुधन विमा योजना केंद्र-राज्यशासन भार
सध्यास्थितीत केंद्रशासनाच्या मदतीने राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत पशुविमा योजना राबविण्यात येते. या योजनेत हप्त्याच्या 40 टक्के रक्कम किंवा भार केंद्रावर असून 30 टक्के भार राज्यावर आहे व उर्वरित 30 टक्के भार लाभार्थ्यावर आहे. राज्य सरकारच्या नवीन योजनेत हा भाग संपूर्णतः राज्य सरकार आणि लाभार्थ्यावर समान प्रमाणात विभागला जाईल.
📣 तुमच्या जिल्ह्याला किती पिक विमा मिळणार? पहा जिल्हानिहाय संपूर्ण यादी
राज्य सरकारच्या प्रस्तावित योजनेत दीड लाख जनावरांची मर्यादा नसेल. एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त पाच जनावरांचाच विमा या योजनेंतर्गत उतरविता येईल.या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी मदत होईल. विमा योजनेमुळे पशुधनाच्या मृत्यू किंवा आजारांमुळे शेतकऱ्यांना होणारे आर्थिक नुकसान कमी होईल.
पशुधन विमा योजना वैशिष्ट्य
- शेतकऱ्यांना पशुविमा खूपच माफक दरात देण्यात येईल, एका जनावरांचा विमा उतरण्याची शेतकऱ्यांना फक्त 3 रुपये लागतील.
- या योजनेत दीड लाख जनावरांची मर्यादा नसेल.
- एका शेतकऱ्याना जास्तीत जास्त त्यांच्या 5 जनावरांचा पशु विमा उतरवता येईल.
- योजनेचा खर्च राज्यशासन व लाभार्थ्यांवर समान प्रमाणात विभागण्यात येईल.
पशुधन विमा योजना लाभ
- राज्यशासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्याच्या पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी मदत होईल.
- विमा योजनांमुळे पशुधनाच्या मृत्यू किंवा आजारांतस्व होणार आर्थिक नुकसान कमी होईल.