केंद्रशासनाकडून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये आर्थिक मदत देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. सदर योजनेसंदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे, त्यामुळे या योजनेचा लाभ मिळवायचा असेल, तर ही माहिती नक्की शेवटपर्यंत वाचा.
पीएम किसान लाभार्थ्याना जुलै महिन्याच्या या चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 27 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता DBT प्रणालीच्या अंतर्गत 2,000 रुपयाची आर्थिक लाभ रक्कम बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे. आता बहुतांश शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की ? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्तासुद्धा याच दिवशी वितरित केला जाईल का ?
याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ
PM किसान सन्मान निधी योजनाअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी काही अटी व शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक करावा लागेल, त्याचप्रमाणे आधार प्रमाणीकरण म्हणजेच e-kyc करावी लागेल. ज्या शेतकऱ्यांनी ही कामा पूर्ण केलेली असतील त्यांना पुढील येणारा 14 वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात येईल.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पहिला हफ्ता कधी मिळेल ?
नुकतीच सदर योजनेसाठी 4 हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे, त्यामुळे या योजनेचा 1 ला हप्ता पीएम किसान योजनेचा 14 व्या हफ्तासोबत दिनांक 27 जुलै 2023 रोजी वितरित केला जाईल, अशी शक्यता संबंधित विभागाकडून दर्शविली जात आहे.
तुम्हाला लाभ मिळेल का ? पात्र- अपात्र यादी अशी तपासा !
राज्यशासनाकडून निर्देश देण्यात आल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता जमा झाला असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात येईल. तुमचं पात्र-अपात्र लिस्टमध्ये नाव आहे का ते पाहण्यासाठी तुम्ही खालील लिंकवर क्लिक करू शकता.
लिस्टमध्ये नाव आहे का ? येथे क्लिक करून पहा !