[अर्ज सुरु] मिनी ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र 2023 अंतर्गत 3.50 लाख रु. इतकं अनुदान मिळणार, याठिकाणी करा अर्ज !

Mini Tractor Yojana 2023 अंतर्गत 03 लाख 15 हजार रुपयांचा अनुदान संबंधित लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. मिनी ट्रॅक्टर योजना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राबविली जात असून या अंतर्गत अनुसूचित जातीनवबौद्ध घटकातील नोंदणी करत स्वयंसहायता बचत गटाला ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात येईल.

Mini Tractor Yojana Maharashtra

मिनी ट्रॅक्टर सबसिडी योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील नागरिक असाल, तरी सदर योजनेसाठी अर्ज करू शकता. मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना नेमकी काय आहे ? यासाठी अनुदान कोणाला देण्यात येईल ? कागदपत्र व अर्ज कुठे करावा ? या संदर्भातील सविस्तर माहिती सदर लेखाच्या माध्यमातून पाहुयात.

सद्यस्थितीत संपूर्ण शेती यंत्राच्या माध्यमातून केली जाते, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची आवश्यकता भासते; परंतु सर्वच शेतकरी बांधवांना आर्थिक अडचणीमुळे मोठा ट्रॅक्टर परवडत नाही. परिणामी याला पर्याय म्हणून शेतकरी मिनी ट्रॅक्टरला पसंती दर्शवतात. मिनी ट्रॅक्टर योजनेच्या माध्यमातून 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर स्वयंसहाय्यता बचतगट लाभार्थ्यांना 90 टक्के अनुदानावर दिलं जातं.

मिनी ट्रॅक्टर अनुदान कोणाला मिळेल ?

  • मिनी ट्रॅक्टर योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध गटातील लाभार्थ्यांसाठी आहे.
  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गट असणे अत्यंत आवश्यक आहे.
  • बचत गटामधील कमीत कमी 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.
  • मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाकडून संबंधित लाभार्थ्यांना 3 लाख 50 हजार रु. इतका अनुदान देण्यात येतं. उर्वरित रक्कम लाभार्थ्यांनी स्वहिशातून भरावी लागेल.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. बचत गटाच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक
  2. बचत गटाचा पॅन कार्ड
  3. बचत गटाच्या खात्याला अध्यक्ष व सचिवांचे आधार लिंक
  4. प्रशिक्षण व प्रमाणपत्र
  5. बचत गटातील सर्व सदस्यांचा जातीचा दाखला
  6. आधार कार्ड व पॅन कार्ड
  7. बचत गटातील सदस्यांची संपूर्ण यादी
  8. कोऱ्या कागदावर फोटोसहित बचत गटांची ओळखपत्र

मिनी ट्रॅक्टरसाठी अर्ज कसा करावा ?

तुम्हाला जर मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ मिळवायचा असेल, म्हणजेच मिनी ट्रॅक्टर हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा लागेल.

🗞️ संपूर्ण बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा !

संपर्क साधल्यानंतर त्याठिकाणी तुम्हाला अर्जाचा नमुना देण्यात येईल. संपूर्ण अर्ज व्यवस्थितरित्या भरून अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्र जोडून विभागात कागदपत्र दाखल करावी लागतील. तुम्ही जर पात्र असाल, तर कागदपत्रांची पडताळणी करून पुढील काही दिवसात मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ तुम्हाला देण्यात येईल.

📣 अधिक माहितीसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य वेबसाईटला भेट द्या.


मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत किती सबसिडी देण्यात येईल ?

सदर योजनेसाठी शासनाकडून 3.50 लाख रु. इतकं अनुदान देण्यात येईल, मात्र यासाठी लाभार्थी अर्जदारांना 10% एवढा हिस्सा अगोदर भरावा लागेल, म्हणजेच अंदाजीत निव्वळ अनुदान 3.15 लाख एवढं मिळेल.

अर्जासाठी पात्रता किंवा अटी व शर्ती काय असते ?

अर्जदार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.

मिनी ट्रॅक्टरसाठी अर्ज कोठे करावा ?

मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुमच्या संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त कार्यालयात विहित मुदतीत अर्ज सादर करावा.

Leave a Comment