अर्ज कसा करावा : महिला किसान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदारांना संबंधित जिल्ह्याच्या सामाजिक न्याय विशेष विभागाच्या कार्यालयामध्ये संपर्क साधावा लागेल. त्या ठिकाणी अर्जदारांनी योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज घेऊन, तू अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून त्यावरील माहिती लिहून आवश्यक त्या कागदपत्रासह जोडून सदर कार्यालयामध्ये सादर करावा लागेल. अर्जदार सदर योजनेसाठी पात्र असेल, तर कार्यालयामार्फत पुढील प्रक्रिया करून महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.