Loan For Dairy Farming : शेतकरी बांधवांसाठी व पशुपालकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्यशासन व केंद्रशासन यांच्यामार्फत पशुधनासाठी शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना खूपच कमी व्याजदरात गाय, म्हैस, शेळी खरेदीसाठी रक्कम दिली जाणार आहे, यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून अर्जदारांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही स्वरूपामध्ये अर्ज करता येणार आहे.
Loan For Dairy Farming
सदर बिनव्याजी कर्ज मिळवण्यासाठी अर्जदारांना कशाप्रकारे अर्ज करावा लागेल. यासाठी लागणारी कागदपत्र, पात्रता याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहूयात. यामध्ये अर्जदारांना जवळपास 1 लाख 60 हजार रुपये इतकी कर्जाची रक्कम मिळणार असून ही रक्कम अर्जदार पशुधन खरेदीसाठी वापरू शकतात.
पशुपालक व शेतकऱ्यांना आता शासनाकडून म्हणजेच शासन निर्धारित बँकेकडून 01 लाख 60,000 रुपयाची आर्थिक मदत गाय, म्हैस इत्यादी पशु खरेदीसाठी दिली जाणार असून ही मदत किसान कार्डच्या माध्यमातून पशुपालकांना किंवा शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. सदर लोन योजनेमध्ये खूपच कमी दरात व्याज आकारल जाईल. जवळपास सदर योजना बिनव्याजी स्वरूपामध्येच आपल्याला मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय वाढू शकता, लवकरच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना व पशुधारकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्र
- अर्जदारांचा आधार कार्ड
- बँक पासबुक
- शेतजमिनीचा सातबारा उतारा
- 8 अ उतारा
- विहित नमुन्यातील अर्ज
- सरकारी किंवा खाजगी डेरीला दूध देत असल्याबाबतचा दाखला
- पासपोर्ट साईज आकाराचा फोटो
- इतर आवश्यक कागदपत्र
अर्ज कसा करावा ?
अर्जदार लाभार्थ्यांना या योजनेमध्ये सहभागी व्हायचं असेल, तर सदर योजना राज्यातील काही भागांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे, त्यामुळे सर्वप्रथम अर्जदारांनी आपल्या संबंधित विभागातील खाजगी दूध डेअरी किंवा आपल्या गावातील पशुवैद्यकीय दवाखाना याठिकाणी जाऊन योजना सुरू असल्या बाबतची खात्री करून घ्यावी.
संबंधित ठिकाणी योजना सुरू असल्यास गाय, म्हैस खरेदीसाठीचा फॉर्म शेतकरी किंवा पशुपालकांना भरावयाचा आहे ज्याअंतर्गत त्यांना 1 लाख 60 हजार रुपये यासाठीच्या कर्जाची मागणी करण्यात येईल. अर्ज भरल्यानंतर सदरचा अर्ज पशुवैद्यकीय दवाखाना यांच्यामार्फत किंवा गावातील खाजगी दूध संकलन केंद्रामार्फत बँकेकडे सादर करावयाचा आहे.
त्यानंतर अर्जाची पूर्तता करत असलेल्या लाभार्थ्यांना बँकेकडून कर्ज पुरवठा केला जाईल. सदर योजनेसाठी लाभार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचा इतर शुल्क आकारला जाणार नाही. वार्षिक 2 टक्क्यापर्यंत व्याजदराने ही रक्कम दिली जाणार असून सदरचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फॉर्मचा नमुना खाली डाऊनलोड करण्यासाठी देण्यात आलेला आहे.