Lek Ladki Yojana : या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर 1 लाख रु. मिळणार, कधी आणि कसे मिळणार ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Lek Ladki Yojana : राज्य शासनामार्फत मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी व भविष्यासाठी विविध अशा योजना राबविण्यात येतात. यामधील महत्त्वाची अशी अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेली योजना म्हणजे लेक लाडकी योजना होय. या योजनेसंदर्भातील महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय नुकताच घेण्यात आलेला असून यासंदर्भातील थोडक्यात माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

लेक माझी लाडकी योजना

लेक माझी लाडकी योजना किंवा लेक लाडकी योजनाअंतर्गत मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी, मुलीच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी, मुलींमधील मृत्यूदर कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे बालविवाह रोखण्यासाठी, कुपोषण कमी करण्यासाठी मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून ही योजना राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना घोषित करण्यात आली.

राज्यात “लेक लाडकी योजना” लवकरच सुरू करून गरीब कुटुंबातील मुलींना सक्षम करण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यासह इतर सर्व कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थित लाभलेली होती.

मुलीच्या जन्मानंतर 1,00,000 रु. मिळणार – कधी आणि कसे ? वाचा

राज्यातील पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारण करत असलेल्या कुटुंबातील मुलीला जन्माच्या वेळी 5,000 रु. इयत्ता 1ली मध्ये प्रवेश घेतल्यानंतर 6,000 रु. 6वी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर 7,000 रु. मुलगी 11 वर्षानंतर 8,000 रु. आणि 18 वर्षानंतर 75 हजार रु. अशी एकंदरीत मुलीला 1 लाख रु. रक्कम शासनाकडून देण्यात येतील अशी घोषणा कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेली आहे. ही योजना फक्त 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलीसाठी लागू असेल, ही बाब लाभार्थ्यांनी लक्षात घ्यावी.

Lek Ladki Yojana : अंमलबजावणी कधी होणार ?

लेक लाडकी योजनेची अंमलबजावणी शासनाकडून लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या या निर्णया दरम्यान लेक लाडकी योजना नियम काय असतील थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे ती आपण या ठिकाणी पाहुयात.

लेक लाडकी योजना नियम

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा. ज्यामध्ये 1 मुलगा किंवा 1 मुलगी असलेल्या कुटुंबात 1 किंवा 2 मुलीचा जन्म झाला, तर त्या मुलीला सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. याचप्रमाणे दुसऱ्या प्रसूतीदरम्यान दरम्यान जुळी मुलं जन्माला आल्यास, एक मुलगा किंवा दोन मुलींना या योजनेचा फायदा होईल. पण आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली पाहिजे.

📣 लेक लाडकी योजना संपूर्ण माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा जन्माला आल्यास, त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुलींना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. दोन्ही जुळ्या मुलींना वेगळी फायदे मिळतील. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. लेक लाडकी योजना मंत्रिमंडळ निर्णयासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळात विविध निर्णय घेण्यात आले, त्यापैकी महत्त्वाचे काही निर्णय खालीलप्रमाणे तुम्ही पाहू शकता.

👉 संक्षिप्त मंत्रिमंडळ निर्णय

  • राज्यात मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू, मुलींना करणार शासन लखपती.
  • सार्वजनिक खाजगी भागीदारीतून उंदचंद जलविद्युत प्रकल्पासाठी नवीन धोरण, मोठ्या प्रमाणावर खाजगी गुंतवणूक शासन जलविद्युत क्षेत्रात करणार.
  • सांगली, अहमदनगर जिल्ह्यात आता नवीन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तयार होणार.
  • पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमीन मिळणार.
  • फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग लवकरच सुरू होणार असून हा प्रकल्प रेल्वे मंत्रालयामार्फत पूर्ण करण्यात येणार.
  • भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे शासनाकडून नवीन जमीन.

Leave a Comment