लेक लाडकी योजनेसाठी निधी आला ! 19 कोटी 72 लाखांचा निधी वितरीत, त्वरित अर्ज करा

मुलीच्या सक्षमीकरणासाठी राज्यशासनाकडून ‘लेक लाडकी योजना’ सुरू करण्यात आली. सदर योजनेच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींना जन्मानंतर विविध टप्प्यावर अनुदान देण्यात येणार आहे. शासनाकडून अधिकृत शासन निर्णय व इतर माहिती देण्यात आल्यानंतर या संदर्भातील निधीसुद्धा शासनाकडून वाटपासाठी वितरित करण्यात आलेला आहे. यासंदर्भातील थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

लेक लाडकी योजना निधी वाटप

शासनाकडून लेक लाडकी योजना सुरू करण्यात आल्यानंतर आता लाभार्थ्यांना रक्कम वाटप करण्यासाठी 19 कोटी 70 लाखाचा निधी वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिली आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, नवी मुंबई मार्फत 36 जिल्ह्यांना 19.70 कोटी वितरित करण्यात आल्यानंतर याबाबत जिल्हास्तरावर जिल्हानिहाय व तालुकास्तरावर तालुकानिहाय कॅम्प आयोजित करून 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही विभागामार्फत करण्यात येत आहे.

लाभार्थ्यांना अर्जासाठी आवाहन

आतापर्यंत जवळपास राज्यातील 35 हजार प्रस्ताव जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेले असून पुढील 15 दिवसात तालुकानिहाय व जिल्हानिहाय कॅम्प आयोजित करून पात्र लाभार्थ्यांना जवळील बालविकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी केला आहे.

📢 लेक लाडकी योजना माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यानंतर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यानंतर 7 हजार रुपये, अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर 8 हजार रुपये, तर मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये याप्रमाणे एकूण 1,0,1000 रुपये एवढी रक्कम देण्यात येईल.

यांनाच मिळणार लाभ

1 एप्रिल 2023 नंतर जन्म घेतलेल्या मुलींना लेक लाडकी योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीकडे पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे. जर एखाद्या व्यक्तीला दोन अपत्य झाली उदाहरणार्थ 1 मुलगा व 1 मुलगी, तर अशा परिस्थितीतसुद्धा मुलीला लाभ देण्यात येईल. पहिले जे आपत्य होईल त्या आपत्याच्या तिसऱ्या व दुसऱ्या अपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आई-वडिलांना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. पहिले आपत्य असेल त्यानंतर जुळी मुली जन्माला आल्यास त्यांना सुद्धा लाभ मिळेल; परंतु त्यासाठी आई-वडिलांनी कुटुंब नियोजन करणे गरजेचे आहे.

Leave a Comment