लेक लाडकी योजना 2023 माहिती
महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना लेक लाडकी योजना घोषित करण्यात आली. ही योजना राज्यातील महिला व मुलींच्या समस्या लक्षात घेता सुरू करण्यात आलेली असून महत्त्वकांक्षी योजना ठरणार आहे. मुलींना प्रत्येक क्षेत्रात मानाचे स्थान मिळून सक्षम होता यावे, यासाठी लेक लाडकी योजना महाराष्ट्र राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण लेक लाडकी योजनेची माहिती पाहणार आहोत.
लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 फॉर्म Pdf
सदर योजनेची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली; परंतु अद्याप लेक लाडकी योजना अधिकृतरित्या राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे लेक लाडकी योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे याबद्दलची माहिती व वेबसाईट शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
त्याचप्रमाणे lek ladki yojana application pdf form उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, ज्यावेळी शासनाकडून सदर योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल, त्यावेळी आमच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन कसे करावे ? याबद्दलची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.
योजना संपूर्ण नाव | लेक लाडकी योजना |
चालू करणार | महाराष्ट्र शासन |
विभाग | महिला व बालकल्याण विभाग |
लाभ स्वरूप | 98,000 रु. |
लाभार्थी | पिवळे व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुली |
अधिकृत वेबसाईट | अद्याप जाहीर नाही |
लेक लाडकी योजना कागदपत्र
- लाभार्थी मुलीचा आधारकार्ड
- लाभार्थी मुलीच्या आई-वडिलांचा आधारकार्ड
- मुलीचा जन्माचा दाखला
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
- बँक पासबुक
लेक लाडकी योजनेचा उद्देश
शासनाकडून प्रत्येक योजना सुरू करण्यापूर्वी त्या योजनेचा एक मुख्य उद्देश ठरविण्यात येतो. त्याचप्रमाणे लेक लाडकी योजनेचा सुद्धा उद्देश काय असेल, हे जाणून घेणे तितकच महत्त्वाचा आहे. लेक लाडकी अभियान किंवा योजना देशातील गरीब कुटुंबातील मुलींना उद्देशून सुरू करण्यात आलेली असून या योजनेच्या माध्यमातून मुलींना जन्मापासून ते शिक्षणापर्यंत किंवा विवाहपर्यंत आर्थिक मदत शासनाकडून केली जाणार आहे.
मुलींचा आर्थिक विकास व्हावा, त्याचप्रमाणे समाजातील होत असलेल्या गर्भपातला आळा घालता यावा यासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली. मुलीच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन समाजात निर्माण होऊन मुलीचे उज्वल भविष्य अमलात यावे, यासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडून महत्वाचं पाऊल टाकण्यात आल.
लेक लाडकी योजनासाठी अर्ज कोण करू शकतात ? Eligibility
- सर्वप्रथम लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- सदर योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आहे.
- इतर राज्यातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- लेक लाडकी योजनेसाठी बँकेत मुलीच्या नावाने खात असणे आवश्यक आहे.
- लेक लाडकी योजना मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत मिळेल.
- राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुली लेक लाडकी योजनेसाठी पात्र असतील.
लेक लाडकी योजनेअंतर्गत मिळणारे फायदे Benefits
- मुलीचा जन्म झाल्यानंतर शासनाकडून सदर योजनेअंतर्गत 5,000 रुपये रक्कम मुलीच्या नावाने बँक खातात जमा केली जाईल.
- मुलगी चौथीत गेल्यानंतर मुलीच्या नावाने 4,000 रु. बँक खात्यात जमा केले जातील.
- मुलगी सहावीत गेल्यानंतर 6,000 रु. मुलीच्या खात्यात जमा केले जातील.
- मुलगी अकरावीत गेल्यानंतर मुलीच्या बँक खात्यात 8,000 रु. जमा करण्यात येतील.
- लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर मुलीच्या शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी रोख 75 हजार रुपये देण्यात येतील.
लेक लाडकी योजना Registration
lek ladki yojana Maharashtra online apply : लेक लाडकी योजनेची फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये घोषणा करण्यात आलेली आहे; अद्याप ही योजना सुरू झालेली नसल्यामुळे या योजनेची नवीन नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन लाभार्थी व्यक्तीला अद्याप करता येणार नाही शासनाकडून लेक लाडकी योजनेचा अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित झाल्यानंतर लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा ऑफलाइन रजिस्ट्रेशन करण्याची माहिती देण्यात येईल तदनंतर लाभार्थ्यांना सदर योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 प्रश्न आणि उत्तर👇
लेक लाडकी योजना काय आहे ?
लेक लाडकी योजना राज्यातील मुलींना जन्मापासून वयाच्या 18 वर्षापर्यंत अर्थसहाय्य देणारी महत्त्वकांक्षी योजना आहे.
लेक लाडकी योजनासाठी अर्ज कुठे करावा ?
लेक लाडकी योजनेसाठी अद्याप कुठे अर्ज करावा. या संदर्भात शासनाकडून माहिती देण्यात आलेली नाही, लवकरच शासनाकडून सदर योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल त्यानंतर अर्जाची प्रक्रिया समजेल.
लेक लाडकी योजनेसाठी किती लाभ देण्यात येईल ?
लेक लाडकी योजनेसाठी मुलीच्या जन्मापासून वयाच्या 18 वर्षापर्यंत जवळपास 98,000 रु. देण्यात येतील.
लेक लाडकी योजना Pdf form कुठे मिळेल ?
लेक लाडकी योजना अद्याप सुरू झाली नसल्यामुळे ही योजना ऑनलाईन आहे की ऑफलाईन याबद्दल संभ्रमण आहे, त्यामुळे लेक लाडकी योजना PDF form कुठेही मिळणार नाही.