शेतकऱ्यांना काही कामास्तव बऱ्याच वेळी शेत जमिनीच्या विविध कागदपत्रांची आवश्यकता भासते. विविध प्रकारची कागदपत्र तहसील कार्यालय व इतर ठिकाणाहून गोळा करताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येऊन जातात; परंतु शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेता शासनाकडून रजिस्ट्री, फेरफार माहिती, ऑनलाइन फेरफार स्थिती इत्यादी सर्व गोष्टी मोबाईलवर पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याबद्दलची थोडक्यात पण कामाची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहूयात.
Land Record Registry Documents
आपल्याला माहीतच आहे, महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाकडून शेतकऱ्यांच्या जमिनीशी निगडित विविध कागदपत्रांची जोपासना करून संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांना आवश्यक त्यावेळी कागदपत्र पुरवठा केली जातात; परंतु काही वेळी कागदपत्र गहाळ होतात किंवा घाईगडबडीत मिळत नाहीत. या सर्व अडचणींना पर्याय म्हणून शासनाकडून एक नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेला असून सदर पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारची कागदपत्र मोबाईलवर पाहता येतील.
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख पोर्टलवर सर्वप्रथम तुम्हाला जमिनीची कागदपत्र पाहण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक टाकून मोबाईल वरती आलेली ओटीपी टाकावी लागेल. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जिल्हा, गाव, तालुका निवडून सर्व माहिती भरल्यानंतर जमिनीशी सर्व संबंधित कागदपत्र तुमच्या मोबाईल वरती पाहता किंवा डाऊनलोड करता येतील.
खालील कागदपत्रांच्या सुविधा उपलब्ध
- फेरफार परत डाऊनलोड करणे
- मालमत्ता पत्रक डाऊनलोड करणे
- मिळकत पत्रिका फेरफार
- फेरफार स्थिती अधिकार क्षेत्र
- प्रलंबित दिवाणी न्यायालय प्रकरण
- अभिलेख पडताळणी
- ई-रेकॉर्ड्स
- ई-नकाशा भू-नकाशा
- ई-मोजणी
- आपली चावडी ई-चावडी
- जमीन महसूल भरणा
- डिजिटल सातबारा उतारा
- डिजिटल 8अ उतारा डाऊनलोड
👇👇👇👇👇👇👇👇
महाराष्ट्र शासन भूमि अभिलेख पोर्टल जमीन रेकॉर्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Hey guys, just stumbled upon 8qsbet the other day. Seems like a decent spot. Anyone else tried them out? Keen to hear your thoughts!
Yo, jili1bet is straight fire! Some crazy unique games and the payouts are pretty sweet. Definitely worth checking if you are looking for something a bit different. Hit that up here: jili1bet