Kusum Solar Pump Yojana List : शेतकऱ्यांना 24 तास सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाकडून संपूर्ण महाराष्ट्रात 14 सप्टेंबर 2021 पासून कुसुम सोलर पंप योजना सुरू करण्यात आली. सदर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानासह सौर पंप उपलब्ध करून देण्यात येत. या योजनेअंतर्गत मागील सुरू झालेल्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली होती, अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 यादी
कुसुम सोलरपंप योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या; परंतु आता पात्र लाभार्थ्यांची आणखी एक यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून या ठिकाणी आपण कुसुम सोलर पंप योजना जिल्हानिहाय अंतिम यादी पाहणार आहोत. सोलर पंप योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मिळालेला आहे; परंतु बहुतांश शेतकरी या योजनेपासून वंचित सुद्धा आहेत.
बहुतांशी शेतकऱ्यांना लाभ न मिळण्याच मुख्य कारण म्हणजे या योजनेच्या माध्यमातून प्रथम येणाऱ्यास लाभ देण्यात येतो. ज्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम नोंदणी केलेली असेल व इतर सर्व बाबीत शेतकरी पात्र असतील, तर सदर शेतकऱ्यांना सौर पंपाचा लाभ दिला जातो.
Kusum Solar Pump List 2023
कुसुम सोलरपंप योजनेच्या भरपूर याद्या यापूर्वी लावण्यात आलेल्या आहेत, अशा सर्व पात्र संबंधित शेतकऱ्यांना एसएमएस पाठवून शेतामध्ये सौरपंप बसविण्यातसुद्धा आलेला आहे. आता पुढील टप्प्यातील यादी संबंधित विभागाकडून म्हणजेच महाऊर्जा कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेले असून पात्र सौरपंप लाभार्थ्यांना लवकरच यादीनिहाय लाभ देण्यात येईल.
👇👇👇👇👇👇👇👇
जिल्हानिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा