Crop Insurance : अतिवृष्टी, पुर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे, यासाठी एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य शासनाकडून आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून शासनाकडून ठरविण्यात आलेल्या विविध दरात आर्थिक मदत केली जाते. याला अनुसरून जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी नुकताच 29 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
2443 कोटी 22 लाख रु. मंजूर
बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी पंचनामा करण्यात आल्यानंतर तात्काळ मदत देण्यात होती; परंतु काही जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्यामुळे शासनाकडून 2243 कोटी 22 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. मंजूर करण्यात आलेली ही रक्कम खरीप हंगाम 2023 मधील अतिवृष्टी, पूर व इतर अन्य कारणामुळे शेतीपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच वाटप केली जाणार आहे.
शासन निर्णयात नमूद करण्यात आलेली नुकसानग्रस्त रक्कम राज्यातील 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना व्यतिरिक्त केली जाणार आहे यासाठीचा प्रसार शासनाकडून प्राप्त झालेला असून संबंधित तालुक्याची यादी तुम्ही खाली देण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये पाहू शकता. सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले की, ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नसेल, अशा शेतकऱ्यांना 31 मार्च 2023 पूर्वी नुकसान भरपाई मिळणार आहे.
लाभ कोणाला मिळणार
- शासन निर्णयात नमूद फक्त 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल.
- यापूर्वी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई निविष्ठा अनुदान प्राप्त केलेले नसावे.
- अनुदान मर्यादा 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत अनुज्ञय असेल.
- फक्त खरीप हंगाम 2023 मधील नुकसानग्रस्तांना मदत करण्यात येईल.
- इतर आवश्यक माहितीसाठी संपूर्ण शासन निर्णय वाचावा.
काय आहे शासन निर्णय ?
खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या 40 तालुक्यामधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता संबंधित शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण रु. 244322.71 लक्ष (दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार फक्त) इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.
खरीप हंगाम 2023 तालुक्यांची यादी व शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा