Solar Pump Online Status : ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी सोलार पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेला असेल, त्यापैकी बऱ्याच लाभार्थ्यांचे अर्ज संबंधित विभागाकडून मंजूर करण्यात आलेले आहेत. ज्या लाभार्थ्यांची अर्ज मंजूर करण्यात आलेली नाहीत, अश्या अर्जाची स्थिती ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. सोलर पंप अर्जाची स्थिती ऑनलाईन कशी पहावी? याबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण पाहूयात.
Solar Pump Online Status
जर तुम्हाला तुमच्या सोलर पंप योजनेच्या अर्जाची ऑनलाईन स्थिती तपासावयाची असेल, तर हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा. बऱ्याचवेळी शेतकऱ्यांना चुकीच्या वेबसाईटची माहिती देऊन फसवणूक केली जाते, त्यामुळे परिणामी योग्य माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. ऑनलाइन अर्जाची स्थिती तपासण्यासाठी याठिकाणी आम्ही खालीलप्रमाणे अधिकृत वेबसाईटची लिंक दिलेली आहे. जेणेकरून तुम्हाला योग्यरीतीने तुमच्या अर्जाची स्थिती तपासता येईल.
तुम्हाला तुमच्या अर्जाची ऑनलाईन स्थिती बघायची असेल, तर तुम्ही महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा बघू शकता. सोलर पंपासाठी जर तुम्ही महावितरण कडे अर्ज केलेला असेल, तर थेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती त्यासंदर्भातील माहिती पाठवण्यात येईल.
वरील लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर याल. त्यावेळेस तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, तुम्ही पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का? त्यानंतर परत एक प्रश्न विचारला जाईल, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान पीएम कुसुम सोलर योजनेसाठी आधीच नोंदणी केली आहे का? जर तुम्ही नोंदणी केली असेल, तर Yes करा अन्यथा No या पर्यायावर क्लिक करा.
- या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी Yes हा पर्याय निवडायचा आहे.
- त्यानंतर तुम्ही अर्ज केलेला अर्जाचा क्रमांक त्या ठिकाणी टाका.
- अर्ज क्रमांक टाकत असताना तुम्हाला MK आयडी दिलेला आहे तोच आयडी त्याठिकाणी टाकायचा आहे.
- त्यानंतर शोधा या बटनावर क्लिक करा.
- शोधा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल.
- उजव्या बाजूला शेवटच्या कोपऱ्यामध्ये तुमचा जर अर्ज मंजूर झालेला नसेल तर तुम्हाला वेटिंग असा पर्याय दाखवण्यात येईल.
अर्ज स्थिती तपासणी दुसरी पद्धत
तुमच्या अर्जाची स्थिती तुम्ही महावितरण प्रमाणेच महाऊर्जेच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा तपासू शकता. या वेबसाईटला थेट भेट देण्यासाठी वेबसाईटची अधिकृत लिंक खालील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
वरील लिंक ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर महाऊर्जेचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल. वेबसाईटवर आल्यानंतर Beneficiary Login असा पर्याय दिसेल. त्या ठिकाणी तुमचा MK आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्या. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती दाखवण्यात येईल.