तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल व तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत आहे किंवा नाही किंवा तुमच्या गावातील इतर शेतकरी लाभार्थ्यांची यादी पहावयाची असेल, तर तुम्ही खालील स्टेप्सचा वापर करून पीएम किसान योजना लाभार्थी यादी पाहू शकता.
खालीलप्रमाणे लाभार्थी यादी तुमचं नाव तपासा
- सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या : येथे क्लिक करा
- वेबसाईट उघडल्यानंतर Payment Success या टॅब अंतर्गत संपूर्ण भारताचा नकाशात त्याठिकाणी तुमच्या राज्याची खात्री करा.
- त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या Beneficiary List या पर्यायावर क्लिक करून सर्वप्रथम तुमचं राज्य त्यानंतर जिल्हा, तालुका व गाव निवडून घ्या.
- अनुक्रमे संपूर्ण माहिती निवडल्यानंतर Get Report या पर्यायावर क्लिक करा.
- Get Report या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातील संपूर्ण लाभार्थ्यांची यादी दाखवण्यात येईल.