रेशन कार्डधारकांना या दिवशी मिळणार आनंदाचा शिधा; या विविध वस्तूंचा समावेश : Ration Card

महाराष्ट्र राज्यातील रेशन कार्डधारक नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. सणासुदीच्या काळात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदया अन्न योजना व प्रधान कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात खाद्य वस्तू उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

गौरी-गणपती आनंदाचा शिधा

राज्यातील गोरगरीब नागरिकांना सवलतीच्या दरात खाद्य वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, या धर्तीवर सन 2024 च्या गौरी-गणपती उत्साहनिमित्त प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, साखर व 1 लिटर सोयाबीन तेल या विविध वस्तूंचा समावेश असलेला “आनंदाचा शिधा” प्रति शिधापत्रिकाधारकास वितरित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय काल दिनांक 12 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला.

महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला असून तुम्ही संबंधित जीआर किंवा शासन निर्णय लेखाच्या शेवटी देण्यात आलेल्या बटनावर क्लिक करून डाउनलोड करून सविस्तर माहिती वाचू शकता. महाराष्ट्र राज्यातील जवळपास 1,70,82,086 शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना हा गौरी गणपती आनंदाचा शिधा वितरित केला जाणार आहे.

कधी मिळणार आनंदाचा शिधा ?

बहुतांश नागरिकांना आता प्रश्न पडलेला असेल, गौरी-गणपती आनंदाचा शिधा कोणत्या कालावधीत मिळणार ? आनंदाचा शिधा दिनांक 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या गावातील रेशन दुकानदाराकडून वाटप करण्यात येणार आहे. संपूर्ण एक महिन्याच्या कालावधीत आनंदाचा शिधा ई-पॉस मशीन प्रणालीद्वारे पात्र शिधापत्रिकाधारकांना 100 रुपये आकारून वितरित करण्यात येईल.

शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील गोरगरीब नागरिकांना अत्यंत कमी व सवलती दरात दैनंदिन जीवनातील आवश्यक अशा वस्तूंचा संच मिळत आहे. तुम्हीसुद्धा पात्र शिधापत्रिकाधारक असेल, तर नक्की संबंधित योजनेचा लाभ मिळवावा.

👇👇👇👇👇

Leave a Comment