भारत सरकारकडून देशातील गोरगरीब नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य कार्ड, श्रम कार्ड, किसान कार्ड, कामगार कार्ड इत्यादी विविध कार्डच्या माध्यमातून नवनवीन योजना सुरू केलेल्या आहेत. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीकडे त्यांच्या गरजेनुसार कार्ड असणे आवश्यक आहे. अशाच विविध पाच प्रकारच्या शासकीय कार्डबद्दलची माहिती आपण याठिकाणी जाणून घेणार आहोत.
विविध शासकीय कार्ड
खालीलप्रमाणे देण्यात आलेली विविध प्रकारची कार्ड काढल्यानंतर शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या अनेक सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवता येणार आहे. कार्ड काढण्यासाठीची प्रक्रिया किंवा अर्ज कसा करावा, यासाठी संबंधित योजनेची अधिकृत वेबसाईट लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.
KCC Card : KCC कार्ड म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड हे विशेषतः शेतकऱ्यांसाठी बनविण्यात आलेले कार्ड असून या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतातील औषधासाठी, बियाणांसाठी व इतर लागवडीसाठी अल्पवधी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत. अगदी तीन लाख रुपयासाठी शेतकऱ्यांना फक्त चार टक्के व्याजदर आकारण्यात येत. शासनाच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत प्राप्त होत आहे.
E-Shram Card : ई-श्रम कार्ड ही योजना केंद्र शासनाकडून 26 ऑगस्ट 2021 ला सुरू करण्यात आली. या योजनेतील कार्ड प्राप्त करणाऱ्या लाभार्थ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा दिला जातो. यासाठी केंद्र शासनाकडून 2022 मध्ये 404 करोड रुपयांचा निधीसुद्धा वितरित करण्यात आला आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना 2 लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण केंद्रशासनाकडून दिले जाते. समजा, अपघातात कामगाराला जीव गमावा लागला, तर कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून 2 लाख रु. शासनाकडून दिले जातात. कामगार अपंग झाल्यास त्याला एक लाख रुपयाची आर्थिक मदत दिली जाते.
आयुष्मान भारत कार्ड : आयुष्मान भारत कार्ड भारतातील गोरगरीब नागरिकांना आरोग्य सुविधा आणि सोबतच विविध शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील नागरिकांना सरकारी व निमसरकारी दवाखान्यात विविध प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया सदर योजनेच्या माध्यमातून मोफत दिले जातात. मोफत शस्त्रक्रिया किंवा उपचाराची मर्यादा 5 लाख रुपयापर्यंत ठेवण्यात आलेली आहे. रेशन कार्डधारकांना सदर योजनेचा लाभ मिळवता येईल.
BPL कार्ड : गरीब कुटुंबातील व्यक्तीसाठी शासनाकडून विशेषता बनविण्यात आलेले कार्ड म्हणजे BPL कार्ड होय. दारिद्र्यरेषेखालील, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना गुलाबी व पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड सदर योजनेच्या माध्यमातून देण्यात येते. या कार्डचा लाभ देशातील अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. या प्रकारचा कार्ड काढण्यासाठी जवळील तहसील कार्यालयास संपर्क साधावा लागेल.
BPL कार्डधारक नागरिकांना सरकारकडून गहू, तांदूळ, जवारी, बाजरी, मका इत्यादी रेशन धान्य मोफत दिलं जातं. यासोबतच जुने घर दुरुस्त किंवा तयार करण्यासाठी देखील या कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येतं. या कार्डमुळे सरकारी दवाखान्यात औषधे व इतर शस्त्रक्रिया मोफत दिली जातात.
कामगार कार्ड : महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार विभागाकडून राज्यातील कामगारांसाठी कामगार योजना राबविण्यात येते, ज्यांतर्गत पात्र लाभार्थ्यांना कामगार कार्ड काढून देण्यात येतो. यासाठी पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून देण्यात आलेल्या अधिकृत महाराष्ट्र कामगार नोंदणी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल.
KCC कार्ड ऑनलाईन | येथे क्लिक करा |
E-Shram कार्ड | येथे क्लिक करा |
आयुष्मान भारत कार्ड | येथे क्लिक करा |
BPL कार्ड | येथे क्लिक करा |
कामगार कार्ड | येथे क्लिक करा |