शासनामार्फत 20 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज या विद्यार्थ्यांना मिळणार; असा करा ऑनलाईन अर्ज : Education Loan Scheme

Education Loan Scheme : शासनाकडून, महामंडळाकडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक योजना राबविण्यात येतात. अशीच एक महत्वपूर्ण योजना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित मुंबईमार्फत भाग भांडवल स्वरूपात प्राप्त होणाऱ्या निधीतून मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना (Educational Loan Scheme) राबविण्यात येते.

मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना

राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित्त निगम, नवी दिल्ली यांच्याकडून कर्ज स्वरूपात प्राप्त होणाऱ्या रकमेतून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येते. खालीलप्रमाणे देण्यात आलेल्या सदर दोन्ही शैक्षणिक कर्ज योजनेतंर्गत अर्ज स्वीकारण्यात येत असून त्यांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहेत.

१. मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना

  • कर्ज मर्यादा रु. 5.00 लाखापर्यंत
  • व्याजदर फक्त 3%
  • 100% कर्ज
  • परतफेड – शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील 5 वर्षे
  • कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. 8.00 लाखापर्यंत
  • विद्यार्थ्यांचे वय 18 ते 32 वर्षे

२. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना

  • कर्जमर्यादा (भारतातील शिक्षणाकरिता) : रु. 30 – 30 लाखापर्यंत
  • व्याजदर – 3 + 2 = 5% (द.सा.द.शे)
  • कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा – शहरी भागासाठी रु. 1,20,000/- पेक्षा कमी, ग्रामीण भागासाठी रु. 98,000/- पेक्षा कमी
  • विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नावरील मर्यादा रु. 1.20 – 8.00 लाखापर्यंत
  • 100% कर्ज (NMDFC- 90%) महामंडळ 10%)
  • विद्यार्थ्यांचे वय – 16 ते 32 वर्षे
  • परतफेड – शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील 5 वर्षे

अर्ज कसा करावा ?

सदर दोन्ही शैक्षणिक कर्ज योजनांच्या अधिक माहितीसाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालय व मुख्य कार्यालयास संपर्क साधावा, तसेच सदर योजनांची माहिती महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

सदर दोन्ही शैक्षणिक कर्ज योजनेतंर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. यासाठी महामंडळाच्या ma1ms.maharashtra.gov.in वेबसाईटचा वापरू करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक व योजनांची माहिती वर नमूद संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सदर दोन्ही शैक्षणिक कर्ज योजनेतंर्गत वर्षभर अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.