महाराष्ट्र राज्यातील दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या 10 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील शेतकऱ्यांना संपूर्णता लाभ मिळावा, यासाठी ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75% पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मि.मि पेक्षा कमी झाले आहे, अश्यावर नमूद दिनांक 10 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णयामधील परिशिष्ट ‘अ’ मध्ये नमूद केलेल्या एकूण 1021 महसूल मंडळापैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूल मंडळी स्थापन करण्यात आलेली आहेत.
त्या नवीन महसूल मंडळामध्ये अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलली नाहीत, अशी मंडळी आणि जिल्हाधिकारी लातूर यांच्या प्रस्तावामधील नवीन 224 महसूल मंडळे देखील दुष्काळसदृश्य मंडळे म्हणून शासनाकडून घोषित करण्यात आलेली असून मागील शासन निर्णयास अनुसरून यासंबंधित उर्वरित मंडळामध्येसुद्धा खालीलप्रमाणे सवलती लागू करण्यासाठी शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.
खालील सवलाती शेतकऱ्यांना मिळणार
- जमीन महसूल सूट
- सहकारी कर्जांचे पूनर्गठन
- शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
- कृषी पंपाच्या चालू विज बिलमध्ये 30.5% सूट
- शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
- रोह्या अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता
- टंचाई जाहीर केलेल्या गावांना शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज खंडित न करणे
वरील सर्व सवलती उर्वरित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना लागू असतील. तुमच्या गावातील शेतकऱ्यांना या सवलती लागू आहेत का ? यासाठी खालील शासन निर्णय पाहू शकता, ज्यामध्ये संपूर्ण दुष्काळसदृश गावाची यादी देण्यात आलेली आहे.
गावांची यादी व शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा