मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये : CM Vayoshri Yojana

5 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वपूर्ण अनेक निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांसाठी आता नवीन मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे. यापूर्वी केंद्रशासनाची राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू होती; परंतु ही योजना ठराविक जिल्ह्यामध्ये राबविली जात असल्यामुळे, राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना फायदा व्हावा, यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाणार आहे.

CM Vayoshri Yojana

मुख्यमंत्री वयोश्री योजना योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये सरसकट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यावरती महाराष्ट्र शासनाकडून दिले जाणार आहेत. ज्या नागरिकांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असेल व वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयापर्यंत असेल, अशाच नागरिकांना वयोश्री योजनेचा लाभ राज्य शासनाकडून देण्यात येईल.

ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात वयोश्री योजना महाराष्ट्र राज्यशासनाकडून राबविली जाणार असून ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागासाठी आयुक्त यांच्यामार्फत सदर योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे दारिद्र्यरेषेखालील व गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांना उदार वयात नक्कीच दिलासा मिळणार आहे.

योजना संपूर्ण नावCM Vayoshri Yojana
लाभार्थीजेष्ठ नागरिक
लाभ स्वरूपरु. 3,000
शासन निर्णय (GR)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळलवकरच सुरू होणार..

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

जेष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनाअंतर्गत 3000 रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रांची यादी तयार ठेवावी लागेल. यादीमधील काही कागदपत्र अनिवार्य असून काही कागदपत्र पर्यायी आहेत, याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.

  • आधारकार्ड किंवा मतदान कार्ड
  • राष्ट्रीयकृत बँकेचा झेरॉक्स
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • अर्जदारांचा स्वयंघोषणापत्र
  • मोबाईल क्रमांक
  • शासनाकडून विहित केलेली अन्य आवश्यक कागदपत्रे

CM Vayoshri Yojana अर्ज कसा करावा ?

मुख्यमंत्री वयोश्री योजना शिंदे सरकारमार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली. याबद्दलचा महत्त्वपूर्ण असा मंत्रिमंडळ निर्णय 5 फेब्रुवारी रोजी घेण्यात आला व त्यासंदर्भातील शासन निर्णय 6 फेब्रुवारी 2024 रोजी शासनाकडून निर्गमित करण्यात आला; परंतु अद्याप सदर योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन अथवा ऑफलाईन असेल किंवा रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करावं ?यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

शासन निर्णयानुसार राष्ट्रीय योजनेच्या धरतीवर सदर योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी स्वातंत्र्य पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून लवकरच विकसित करण्यात येणार आहे. पोर्टल विकसित झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये सरसकट लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

👇👇👇👇👇👇👇👇

मुख्यमंत्री वयोश्री योजना संपूर्ण माहिती, शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment