शेतकऱ्यांसाठी राज्यात छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना सुरु, जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती सविस्तर : MahaDBT Scheme

MahaDBT Scheme : राज्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असणारी यंत्रसामग्री, घटक/बाब इत्यादी त्याला मागणी केल्यानंतर तातडीने उपलब्ध व्हावीत, असा महाराष्ट्र शासनाचा सततचा ध्यास राहिलेला आहे. हाच विचार करता शेतकऱ्यांना मोठा फायदा व्हावा, यासाठी वित्तमंत्री महोदयांनी सन 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये भाषण करत असताना 2023-24 या आर्थिक वर्षात मागेल त्याला शेततळे या योजनेचा विस्तार करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना

याअंतर्गत मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला ठिबक/तुषार सिंचन, शेततळे शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र आणि कॉटन श्रेडर देण्याबाबत मागेल त्याला शेततळे या योजनेच्या विस्तारित योजनेस शासन परिपत्रकांन्व्यये मान्यता देण्यात आली असून शासन निर्णय (GR) सुद्धा निर्गमित करण्यात आला होता.

कृषी क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा योगदान लक्षात घेता, शासनाकडून त्यांच्या 350व्या राज्यभिषेकाच्या वर्षपूर्तीनिमित्त मागेल त्याला फळबाग, ठिबक/तुषार सिंचन, शेततळे शेततळ्याच्या अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह आधुनिक पेरणीयंत्र आणि कॉटन श्रेडर देणे या विस्तारित योजनेचे नामांतरण किंवा नाम बदलून छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना असं नाव देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय (GR) निर्गमित

शासनाकडून कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मागेल त्याला फळबाग, ठिबक/तुषार सिंचन, शेततळे, शेततळ्याच अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र आणि कॉटन श्रेडर इत्यादी अनुदान तत्वावर देण्याच्या या विस्तारित योजनेस दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजीच्या शासन निर्णयांनुसार आता छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना असं नाव देण्यात आलेलं आहे.

📣 छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

छत्रपती शिवाजी महाराज नवीन कृषी योजना या अगोदर मागेल त्याला योजना या नावाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आलेली होती; परंतु 18 ऑक्टोबर 2023 च्या शासन निर्णयानुसार आता या योजनेला नामांतर करण्यात आलेला असून ही योजना छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना या नावाने संबोधली जाईल.

शासनाकडून निधी उपलब्ध

नवीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यामार्फत सप्टेंबर 2023 मध्ये या योजनेचा आढावा घेण्यात आला. सदर योजनेसंदर्भात महत्त्वाची आढावा बैठक घेऊन योजनेमधील लॉटरी पद्धत कायमस्वरूपी बंद करण्यात आली, लॉटरी पद्धत बंद करण्याचा मुख्य हेतू म्हणजे, लॉटरी पद्धतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता, त्यामुळे आता ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या आढावा बैठकीमध्ये पुन्हा एकदा महाडीबीटी या योजनेसाठी लॉटरी पद्धत बंद करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश कृषीमंत्री यांच्याकडून देण्यात आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना खालील विविध बाबींसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल

  • फळबाग
  • शेडनेट
  • हरितगृह
  • बीबीएफ पेरणी यंत्र
  • शेततळे व प्लास्टिक अस्तरीकरण
  • ठिबक व तुषार सिंचन

छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना 1,000 कोटी रुपयाच्या निधीमधून दोन टप्प्यात राबविण्यात येईल. ज्यामध्ये पहिल्या वर्षात 600 कोटी आणि दुसऱ्या वर्षांमध्ये 400 कोटी इतका निधी वापरण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आता राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या विविध साधनसामुग्री/घटक इत्यादीची लवकर उपलब्धता अनुदान तत्त्वावर होईल.

Leave a Comment