Panjab Dakh Havaman Andaj : राज्यामध्ये मृगबहार सुरू झालेला असूनसुद्धा पावसाअभावी बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी झालेली नाही. राज्यामध्ये 25 जून ते 30 जून दरम्यान काही प्रमाणात पाऊस पडला. त्या पावसावर मोजक्याच शेतकऱ्यांकडून पेरणी करण्यात आली, अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांची पेरणी शिल्लक आहे. या कालावधीत सर्व ठिकाणी पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी रखडली, तर काही भागात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी जोमाने पेरणी केली.
आज दिनांक 3 जुलै 2023 रोजी हवामान अंदाज तज्ञ पंजाब डक साहेब यांच्याकडून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. दिनांक 3 जुलै ते 9 जुलै 2023 या कालावधीत पाऊस होणार असून पावसाचा अंदाज बघून शेतकरी पेरणी करू शकतात. त्याचप्रमाणे ज्या शेतकरी बांधवांना या कालावधीत पेरणी करणे शक्य होत नसेल, त्यांना 13 जुलै ते 17 जुलै दरम्यान देखील पुन्हा पाऊस पडणार आहे. त्या कालावधीत त्यांना पेरणी करता येईल.
⭕ सूचना : शेवटी हा हवामान अंदाज असल्याकारणाने वाऱ्यामध्ये बदल झाल्यास हवामानसुद्धा बदलते माहिती असावे.