तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही का ? चिंता करु नका ! आता नोंदणीसाठी शासनाकडून परत एकदा संधी

PM-Kisan : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. कुणाचं नाव नोंदीत चुकलं, कुणाचं वारसाहक्काचं काम प्रलंबित राहिलं, तर कुणाच्या कागदपत्रात तांत्रिक त्रुटी होत्या.

अशा सर्व शेतकर्‍यांना आता शासनाकडून पुन्हा एकदा नवीन संधी उपलब्ध करुन दिली जात आहे. या नव्या निर्णयामुळे आतापर्यंत वगळले गेलेले शेतकरी आता योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत. पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा केलं जाणार आहे.

नवीन नोंदणीची संधी

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 12 हजार रुपये दिले जातात. यामध्ये केंद्र सरकारकडून 6 हजार आणि राज्य सरकारकडून 6 हजार रुपये मिळतात. ही रक्कम 3 समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.

लहान व अल्पभूधारक शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. मात्र शेतकऱ्याचं नाव, राज्य किंवा केंद्रसरकारच्या अधिकृत जमीन नोंदीत असणं आवश्यक आहे.

त्याचबरोबर आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाइल क्रमांक एकमेकांशी लिंक असणंही गरजेचं आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळ शेतकरी स्वतः किंवा जवळील एससी Center अथवा आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातुन खालील देण्यात आलेल्या वेबसाईट वरुन आपली नोंदणी करु शकतात.

वरील वेबसाईटवर जाऊन नवीन शेतकर्‍यांना अर्ज करायचा आहे. वेबसाइटवर “नवीन शेतकरी नोंदणी” हा पर्याय निवडावा. त्यानंतर राज्य निवडून आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाकावा.

ओटीपी आल्यानंतर वैयक्तिक माहिती, जमिनीची माहिती आणि बँक खात्याचे तपशील भरून अर्ज सबमिट करावा.

ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणत्याही कारणामुळे या योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांनी ही संधी सोडू नये. योग्य कागदपत्रांसह वेळेत अर्ज केल्यास थेट बँक खात्यात लाभाची रक्कम दर 3 महिन्यानी मिळू शकते.

4 thoughts on “तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही का ? चिंता करु नका ! आता नोंदणीसाठी शासनाकडून परत एकदा संधी”

  1. Pingback: hello world
  2. Pingback: vardenafil 20mg
  3. Pingback: ciprofloxacin
  4. Pingback: doxycycline mono

Comments are closed.