गाय म्हैस कारवड व कडबा कुटीसाठी 50% अनुदान ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू : याठिकाणी करा ऑनलाईन अर्ज

चालू वर्षाकरिता इच्छुक शेतकरी किंवा नागरिकांना विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प अंतर्गत गाय,म्हैस, कडबा कुटी इत्यादीसाठी 50 टक्के अनुदान मिळणार आहे. विदर्भ व मराठवाड्यातील 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संबंधित योजनेचा लाभ देण्यात येईल.

ग्रामीण भागातील पशुपालकांचे किंवा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे. त्यांचा दूध व्यवसाय दैनंदिन वाढत जावा, यासाठी राज्य शासनाकडून विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा – 2 (व DP) सुरू करण्यात आला आहे.

हा महत्त्वकांक्षी प्रकल्प सन 2024-25 ते 2027-28 या 4 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रातील तब्बल 19 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

VMDP योजना उद्देश

या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील लहान व मध्यम पशुपालकांची किंवा शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करणे हा आहे. बाजारातील वाढते पशुखाद्य दर, कमी दुधाचा उत्पादन व आधुनिक सुविधांचा अभाव यामुळे पशुपालक अडचणीत येत आहेत, हीच अडचण लक्षात घेता या योजनेच्या माध्यमातून पशुपालकांना अनुदान उपलब्ध करून दिल जात आहे.

पशुपालकांना दुधाळ गाय, म्हैस, कडबा कुटी मशीन इत्यादी 50 ते 75 टक्के अनुदानावर या प्रकल्पाच्या माध्यमातून दिले जातात. यासोबतच या प्रकल्पामध्ये सात महिन्यांची गाभण कालवड 75 टक्के अनुदानावर दिली जाते.

  • प्रजनन पूरक खाद्य – 25% अनुदान
  • फॅट व SNF वर्धक खाद्य – 25% अनुदान
  • मूरघास (सायलेज) – 25% अनुदान

कडबा कुटी 50% अनुदान

गाय, म्हैस सोबत कडबा कुटी यंत्रसुद्धा शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. दुधाळ जनावरांना पौष्टिक कडबा भेटावा म्हणून कडबाकुट्टी यंत्र 50 टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिल जाणार आहे, ज्यामुळे पशुपालकांच्या वेळ, मेहनत आणि खर्चामध्ये नक्कीच बचत होईल.

पात्र कोण असणार ?

  • अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  • अर्जदार विदर्भ किंवा मराठवाड्यातील शासन निर्णय दिलेला 29 जिल्ह्यातील पशुपालक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे किमान 1 तरी दुधाळ जनावर असावे. जनावरांचे काळजी घेण्याची क्षमता व दुग्धव्यवसाय करण्याची क्षमता असावी.

अर्जासाठी लागणारी कागदपत्रे

  1. अर्जदारांचा आधारकार्ड
  2. रेशन कार्ड
  3. राशन कार्डवरील सर्व सदस्यांचे आधार नंबर
  4. दूध खरेदी प्रमाणपत्र
  5. सातबारा उतारा
  6. पशु आधारकार्ड (Tag नंबर)
  7. बँक पासबुक झेरॉक्स

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

VMDP योजना बातमीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा