24 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. हवामान तज्ञांच्या मते, हा पट्टा हळूहळू सरकत राज्याकडे येईल आणि 28 तारखेपर्यंत त्याचा प्रभाव दिसू शकतो. या कमी दाबाच्या परिणामामुळे राज्यात 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान आभाळ जडसर राहील आणि पावसाचे प्रमाण वाढेल.
या काळात अनेक भागात पावसाची तीव्रता वाढू शकते. म्हणजेच या काळात शेतकरी, प्रवासी किंवा कोणालाही हवामानामुळे खबरदारी घेणं फायद्याचं ठरेल.
मान्सून पुन्हा सक्रिय
या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. त्यामुळे किमान ३० सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून मान्सून जाण्याची शक्यता नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २२ ते २५ सप्टेंबर या काळात राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस बहुतेक वेळा दुपारी किंवा संध्याकाळी होईल.
26 सप्टेंबरपासून कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम दिसायला सुरुवात होईल. त्या दिवशी विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व-दक्षिण भागात दुपारनंतर पावसाची तीव्रता वाढेल. 27 सप्टेंबरला मात्र पावसाचा व्याप अजून वाढेल. यादिवशी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये पावसाची जोरकस उपस्थिती राहू शकते. काही ठिकाणी तर मुसळधार स्वरूपाचा पाऊसही होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी पूर्वनियोजन आवश्यक
त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी या काळात हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन तयारीत राहणं फायदेशीर ठरेल.
28 सप्टेंबरला राज्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार शेतीचं नियोजन करणं गरजेचं आहे. आधीच काढणी केलेली पिकं पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवा, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
📍 शेतीच्या उत्पन्नासाठी माती परीक्षण आवश्यक, जाणून घ्या सविस्तर माहिती