लाडकी बहीण योजना KYC सुरु आता अशी करा केवायसी : Ladki Bahin Yojana KYC

Ladki Bahin Yojana KYC : लाडकी बहीण योजना संदर्भात शासनाकडून वेळोवेळी महत्त्वपूर्ण बदल केले जात आहेत. आता असाच एक महत्त्वपूर्ण बदल शासनाकडून नुकताच करण्यात आलेला आहे. आता प्रत्येक लाभार्थी महिलांना ई-केवायसी म्हणजेच आधार सत्यापण करावं लागणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या लाभार्थी महिलांनाच या योजनेचा आर्थिक लाभ यापुढे दिला जाणार आहे.

Ladki Bahin Yojana KYC

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून केवायसी प्रक्रिया आता बंधनकारक करण्यात आलेली आहे. ज्या महिला केवायसी करणार नाहीत, अशा महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण लाभार्थी केवायसी प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यामुळे प्रत्येक लाभार्थी महिलेने KYC करणे गरजेचे आहे.

लाभार्थी महिला शासनाकडून देण्यात आलेल्या या वेबसाईटवर केवायसी करू शकतात. महिलांना घरबसल्या आपल्या मोबाईलवरून ekyc करता येणार आहे.

बँक खात्याला आधार लिंक आवश्यक

लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे अनिवार्य आहे. आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल, तर अशा लाभार्थी महिलांना योजनेचे पैसे जमा होणार नाहीत.

लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे. तसेच त्या महिलेचे कुटुंबाचे आर्थिक वार्षिक उत्पन्न हे 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी असावे.

eKYC का महत्त्वाची आहे ?

शासनाच्या या योजनेत मोठ्या प्रमाणावर महिला लाभार्थी सहभागी आहेत. त्यांची खरी ओळख पटवून देवून अनुदान योग्य व्यक्तींना मिळवा हा मुख्य उद्देश आहे. eKYC प्रक्रियेमुळे बनावट अर्जदारांना आळा बसेल.

पात्र महिलांना खात्रीशीर लाभ मिळेल. आर्थिक व्यवहार पारदर्शक राहतील. म्हणूनच लाडकी बहिण योजना पडताळणी 2025 मध्ये आधार ई-केवायसी ही आवश्यक पायरी करण्यात आली आहे. त्यामुळेच यासंदर्भात शासनाचा नवीन जीआर आलेला आहे.

लाडकी बहीण योजनेची KYC कशी करावी ?

  • सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेची ladakibahin.maharashtra.gov.in वेबसाईट उघडा.
  • वेबसाईट उघडल्यानंतर खालीलप्रमाणे तुम्हाला केवायसी करण्यासाठी पर्याय दिसेल.
  • मोबाईलवर जर हा पर्याय दिसत नसेल, तर Chrome Browser मध्ये उजव्या बाजूच्या वरील कोपऱ्यातील 3 डॉटवर क्लिक करून Desktop Site हा पर्याय निवडा.

  • “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकता” हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुमच्यासमो आधार कार्ड नंबर टाकण्यासाठी, त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेचा 12 अंकी आधार कार्ड नंबर टाका.

  • Captcha कोड टाका आणि मला सहमती आहे हा पर्याय निवडून ओटीपी पाठवा, या बटणावरती क्लिक करा.
  • ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईलवरती 6 अंकी ओटीपी पाठविण्यात येईल.
  • आधार लिंक मोबाईलवर आलेला ओटीपी सबमिट करा.

..त्यानंतर पुढील प्रक्रिया लवकरच अपडेट केली जाईल..