शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकतीच शासनाकडून पीक नुकसान भरपाई यादी जाहीर करण्यात आलेली असून यादीतील नमूद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पीक नुकसान भरपाई रक्कम जमा होणार आहे.
जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यामधील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाच नुकसान अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेलं होतं, त्यासाठी ही भरपाई जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय (GR) नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे, तर पाहूयात कोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे.
नुकसान भरपाई यादी 2025 GR
12 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर पीक नुकसान भरपाई संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला.
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 73 कोटी 54 लाख 3 रुपये एवढा निधी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे. हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाईल.
या शासन निर्णयासोबत ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक नुकसान भरपाई रक्कम जमा केली जाणार आहे, अश्या जिल्ह्यांची यादी देण्यात आली आहे. खालील बटनावर क्लिक करून तुम्ही तो शासन निर्णय पाहू शकता.
कोणत्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार ?
- नागपूर
- वर्धा
- चंद्रपूर
- हिंगोली
- सोलापूर
यामध्ये नागपूर विभाग छत्रपती संभाजी नगर विभाग व पुणे विभागातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. एकंदरीत सर्व जिल्ह्याचा विचार केल्यास मदत वितरित करण्यासाठी 73 कोटी 54 लाख 3 हजार रुपये इतका निधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिला आहे.
शेतकर्यांना फायदा कसा होणार ?
- पिकांच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात येईल.
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाच ही मदत दिली जाणार आहे.
- शासनाकडून जिल्हावार यादी (पीक नुकसान भरपाई यादी 2025) जाहीर करण्यात आलेली असून त्यामधून पात्र शेतकरी तुम्ही स्वतः तपासू शकता.
पीक नुकसान भरपाई यादी कुठ पाहता येईल ?
12 सप्टेंबर 2025 रोजी शासनाकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये पात्र जिल्ह्यांची यादी दिलेली आहे.
या जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान झाल्याकारणाने शासनाकडून त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेली आहे. ही यादी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा अधिकृत पोर्टलवर तपासणी करावी.
1. कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ?
या नुकसान भरपाई यादी 2025 मध्ये नागपूर विभागातील नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर; छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली त्याचप्रमाणे पुणे विभागातील सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.
2. जर यादीत नाव नसेल तर काय करावे ?
नुकसान भरपाई यादीत जर तुमचं नाव नसेल, तर जिल्हा कृषी अधिकारी किंवा तहसीलदाराकडे तुम्हाला लेखी अर्ज करावा लागेल. लेखी अर्जासोबत नुकसान पुरावे, फोटो, साक्षीदार इत्यादी माहिती जोडावी.
3. भविष्यात अशा नुकसानीसाठी काय उपाययोजना?
शासनाने हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर विमा योजना (PMFBY) आणि जलसाठवण योजनांना प्रोत्साहन दिले आहे. शेतकऱ्यांनी पिक विमा घ्यावा आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार हायब्रिड बियाणे वापरावे. नुकसान भरपाई यादी २०२५ सारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांना आधार मिळेल, पण प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.