Crop Insurance : या सर्व शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई; जिल्हानिहाय नुकसान भरपाईचा शासन निर्णय जारी !

Crop Insurance : आता सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार असून या संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय 2 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात आलेला आहे. अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचा नुकसान मोठ्या प्रमाणावर होत परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून शासनाकडून आपत्ती प्रतिसाद निधीमधून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येते. 2024 मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडून नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, याबद्दलची सविस्तर माहिती संबंधित लेखात देण्यात आली आहे.

नुकसान भरपाईसाठी 596 कोटी रुपये निधी मंजूर

जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याकरिता शासनाकडून संदर्भातील क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये ५९६.२१९५  596 कोटी 21 लक्ष 95 हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाचे मंजुरी देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून ठरवलेल्या विहित दरात ध्येय असेल.  शेती पिकांच्या नुकसानी करिता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.  जानेवारी 2024 ते मे 2024 या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने हा निधी वाटपाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ

जिल्हा नावबाधित कालावधी
नाशिकफेब्रुवारी, एप्रिल, मे २०२४
धुळेफेब्रुवारी, एप्रिल, मे २०२४
जळगावफेब्रुवारी, एप्रिल, मे २०२४
अहमदनगरजानेवारी, एप्रिल, मे २०२४
सोलापूरएप्रिल २०२४
पुणेएप्रिल २०२४
अमरावतीफेब्रुवारी २०२४
अकोलाफेब्रुवारी, मार्च, एप्रिल २०२४
यवतमाळफेब्रुवारी, मार्च, एप्रिल २०२४
बुलढाणाफेब्रुवारी, मार्च, एप्रिल २०२४
वाशीमफेब्रुवारी, मार्च, एप्रिल २०२४
गोंदियाफेब्रुवारी २०२४
नागपूरफेब्रुवारी, मार्च, एप्रिल २०२४
भंडाराफेब्रुवारी, मार्च, एप्रिल २०२४
चंद्रपूरफेब्रुवारी, मार्च, एप्रिल २०२४
गडचिरोलीफेब्रुवारी, एप्रिल २०२४

वरील रखान्यात जिल्ह्यांची  नाव व संबंधित जिल्ह्यातील नुकसान भरपाई चा कालावधी देण्यात आलेला आहे.  याव्यतिरिक्त बाधित क्षेत्र हेक्टर बाधित शेतकऱ्यांची संख्या एकूण मंजूर करण्यात आलेला निधी याची सविस्तर माहिती तुम्ही शासन निर्णयामध्ये पाहू शकता. शासन निर्णयाची लिंक खालीलप्रमाणे दिलेली असून शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या बटनावरती क्लिक करू शकता.

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️