Government Loan Schemes : शासनाकडून नागरिकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. यामागील मुख्य उद्देश म्हणजे त्यांना सुरुवातीला व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत मिळावी, जेणेकरून स्वतःचा व्यवसाय सुरु झाल्यानंतर टप्याटप्याने कर्ज फेडता येईल. सदर लेखाच्या माध्यामातून आपण अश्याच 09 प्रकारच्या कर्ज योजनाबद्दलची माहिती पाहणार आहोत.
शासनाच्या 11 कर्ज योजना
सुरुवातीला प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असतो; मात्र व्यवसाय सुरु करण्यासाठी सर्वांकडे पैसे असतातच असं नाही. त्यामुळे अनेकजण Loan घेण्याकडे वळतात. कर्ज घेण्यासाठी अनेक ठिकाणी अर्ज करतात; मात्र त्यांना त्याठिकाणी निराशा मिळते, कारण कर्ज मिळणं आता एवढं सोपं राहिलं नाही. मात्र, आज आपण या लेखात कर्ज घेण्याचे अनेक मार्ग सांगणार आहोत, जे सरकारी कर्ज योजना असणार आहेत, ज्यांतर्गत तुम्हाला झटपट कर्ज मिळून जाईल.
1) प्रधानमंत्री मुद्रा योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून तरुणांना रोजगार निर्मितीसाठी सुरुवातीला काही प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. या योजनेअंतर्गत तुम्हाला 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. व्यावसायिकांना 50,000 रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत कोणत्याही तारण न घेता म्हणजे कोणत्याही हमीशिवाय व्यवसाय कर्ज मिळते. या योजनेअंतर्गत महिलांनी जर कर्ज घेतले तर व्याजदरात सवलत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2) स्टार्टअप इंडिया
स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली. रोजगार निर्मिती करणं हा या योजनेचा उद्देश आहे. भारत सरकारच्या या योजनेअंतर्गत व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन आकर्षक व्याजदरात कर्ज मिळवू शकता. (government buisness loan scheme)
3) PSB/MSME कर्ज योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 साली ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अवघ्या एका तासात 1 लाख ते 5 कोटी पर्यंत कर्ज मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने https://www.psbloansin59minutes.com/home) हे पोर्टल सुरू केले आहे.
4) स्टॅंड अप इंडिया
ही योजना 2016 साली सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. ही योजना अनुसूचित जाती व जमाती, मागासवर्गीय आणि महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करावा यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.
5) राष्ट्रीय लघू उद्योग महामंडळ (NSIC) अनुदान
ही योजना लघु उद्योजकांसाठी सुरू करण्यात आली आहे. भारत सरकारचे राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ ही योजना दोन प्रकारचे आर्थिक लाभ देते. विपणन सहाय्य आणि कच्चा माल सहाय्य. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही सुरक्षा ठेव करण्याची गरज नाही. विपणन सहाय्य योजना व्यवसायांना त्यांचे बाजारपेठेतील मूल्य आणि ब्रँड ओळख सुधारण्यास मदत करते.-क्रेडिट सहाय्य योजना कच्चा माल, भांडवल आणि मार्केटिंग साठी आर्थिक सहाय्य देते.
6) क्रेडिट हमी योजना
भारत सरकारने सुक्ष्म आणि लघु उद्योजकांसाठी क्रेडिट हमी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला 5 लाखांपर्यंत कर्जासाठी सूक्ष्म उद्योजकांना 85% क्रेडिट सुविधा दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही सार्वजनिक, खाजगी किंवा ग्रामीण बॅंकेला भेट देऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता.
7) एमएसएमई कर्ज योजना
ही कर्ज योजना लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा असलेला व्यवसाय विस्तारण्यासाठी कर्ज देते. तसेच नवीन व्यावसायिक उपक्रम सुरू करायचे असल्यास या योजनेद्वारे 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्ज प्रक्रियेसाठी सामान्यतः 8-12 दिवसांचा कालावधी लागतो. तर याउलट कर्ज अर्ज फक्त 59 मिनिटांत मंजूर किंवा नाकारले जाऊ शकतात.
8) क्रेडिट गॅरंटी फंड योजना (CGTMSE)
ही योजना बऱ्याच कालावधी पासून तारण कर्ज मुक्त सुविधा देते. ही योजना कोणतेही तारण घेतल्याशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे भांडवली कर्ज देते.
09) क्रेडिट-लिंक कॅपिटल सबसिडी योजना
ही योजना मार्केटिंग आणि उत्पादनासह तांत्रिक प्रगतीसाठी पैशांची आवश्यकता असलेल्या उद्योगांना मदत करते.
सरकारी व्यवसाय कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- 1) कर्जाचा अर्ज नमुना
- 2) AOA
- 3) पॅन कार्ड
- 4) आधार कार्ड
- 5) रहिवासी प्रमाणपत्र
- 6) उत्पन्न प्रमाणपत्र
- 7) बॅंक स्टेटमेंट
- 8) पासपोर्ट आकाराचा फोटो
- 9) मोबाईल नंबर