कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना; शासनाकडून 20 हजार रुपयापर्यंत अनुदान मिळवा : Chaff Cutter Machine

शेतकऱ्यांसाठी शासनाकडून विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने ठिबक, सिंचन तुषार सिंचन, सोलरपंप, अनुदानावर बी-बियाणे वाटप आणि इतर विविध उपकरण अनुदानावर वाटत यांचा मुख्य समावेश आहे. यामधील अशाच एका उपकरणासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येतं. ती म्हणजे कडबा कुटी मशीन अनुदान होय. कडबा कुटी मशीनसाठी सबसिडी किती? कागदपत्र कोणती व अर्ज कसा करावा ? याबद्दल आपण सदर लेखात माहिती पाहुयात.

कडबा कुटी मशीन अनुदान योजना

शेतकऱ्यांना विविध काम करत असताना एखाद्या विशिष्ट कामासाठी सहज व सोयीस्करपणा यावा हा उद्देश लक्षात ठेवून शासनाकडून कडबा कुट्टी यंत्र खरेदीसाठी अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागात शेतकरी किंवा पशुपालक गाई, म्हशी, शेळ्या किंवा इतर पशुंचं मोठ्या प्रमाणावर पालन करत असतात. गाई, म्हशी, शेळ्या किंवा इतर पशुंसाठी खाण्याचा चारा लागतो. खाण्याचा चारा किंवा गवत कापताना पशुपालकांना काबाडकष्ट करून जनावरांच्या खाण्याची सोय करावी लागते.

शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेता गुराढोरांचा, जनावरांचा चारा कडबाकुट्टी मशीनच्या साह्याने एकदम कमी वेळेत व सोयीस्कर पद्धतीने कापता येतो. हाच विचार करून कडबा कुट्टी मशीनसाठी शासनाकडून जवळपास 20 हजार रुपयापर्यंत लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. कडबा कुटी मशीनचे अनेक फायदे आहेत.

कडबा कुटीसाठी सबसिडी किती?

कडबा कुटी मशीनची साधारणता किंमत बाजारपेठेत 10,000 रुपयापासून ते 40,000 रुपयापर्यंत आहे. कडबा कुटी मशीनची किंमत शेतकऱ्यांच्या जनावरांची क्षमता कडबा कटिंग स्पीड म्हणजेच मशीन किती एचपीची आहे? 3HP, 5HP यावरती ठरवली जाते. याचप्रमाणे कडबा कुट्टी मशीनमध्ये दोन प्रकारच्या मशीन आढळून येतात. ज्यामध्ये कडबा कुटी मॅन्युअल मशीन व कडबा कुटी ऑटोमॅटिक मशीन यांचा समावेश आहे.

मॅन्युअल मशीन स्वस्त असतात, तर याउलट ऑटोमॅटिक मशीन महाग असतात; कारण यामध्ये इलेक्ट्रिक मोटर बसवलेली असते. कडबा कुट्टी मशीनसाठी अनुसूचित जाती आणि जमाती महिला आणि अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांच्यासाठी कमाल मर्यादेच्या 50 टक्के अनुदान देण्यात येईल अथवा 20 हजार रुपयापर्यंत अनुदान देय असेल.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे (Documents)

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित अर्जदारांकडे खालील महत्त्वाची कागदपत्र असणे आवश्यक आहे.

  • शेतकऱ्यांचा आधारकार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • जमिनीचा सातबारा उतारा
  • जमिनीचा 8अ उतारा
  • शेतातील पिकांची माहिती
  • GST बिल, कोटेशन, हमीपत्र, करारनामा (लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर)

कडबा कुट्टी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? Chaff Cutter Online Application

कडबा कुटी मशीन अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून तयार करण्यात आलेल्या महाडीबीटी फार्मर पोर्टलवरती नोंदणी करावी लागेल. नोंदणी करताना अर्जदाराची संपूर्ण माहिती कागदपत्र इत्यादी भरून अंतिम अर्ज दाखल करावा लागेल. त्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड होऊन शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतर अनुदान देण्यात येईल.

👇👇👇👇👇👇👇👇

ऑनलाईन अर्ज कसा करावा? येथे क्लिक करा

Leave a Comment