Annabhau Sathe Karj Yojana : राज्य व केंद्र शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या सरकारी योजना, शेतकरी योजना, महिलांसाठी विशेष योजना, पेन्शन धारकांसाठी योजना इत्यादी विविध योजना राबविण्यात येतात. या विविध योजनांसोबतच नवयुवक-तरुणांना व्यवसाय करण्यासाठी बीज भांडवल उपलब्ध व्हावं, या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे अण्णाभाऊ साठे कर्ज योजना होय.
अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना 2023
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून अण्णाभाऊ साठे कर्ज योजना राबविण्यात येते. सदर योजनेअंतर्गत राज्यातील मातंग समाजातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जातात. जेणेकरून बेरोजगार तरुणांना आधार उपलब्ध होईल आणि त्यांना त्यांची कौटुंबिक परिस्थिती सुधारता येईल. अण्णाभाऊ साठे कर्ज योजना अंतर्गत सुरुवातीला फक्त 25 हजार रु. कर्ज दिल जायचं; परंतु वाढत्या मागणीमुळे ही मर्यादा वाढवून 1 लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे.
अण्णाभाऊ साठे कर्ज योजनेला मागासवर्गीय योजना, अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना, व्यवसाय कर्ज योजना, अनुसूचित जातीसाठी कर्ज योजना किंवा अण्णाभाऊ पाटील महामंडळ कर्ज योजना या विविध नावान ओळखल जाते. सदर योजनेसाठी अर्ज कसा करावा ? यासाठीची पात्रता काय असेल ? कोणत्या जातीतील अर्जदारांना या योजनेचा लाभ देण्यात येईल ? यासाठी अर्ज कुठे करावा ? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
राबविल्या जाणाऱ्या विविध योजना
अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. व्यवसायाच्या स्वरूपानुसार अर्जदार लाभार्थ्यांना कर्जाची रक्कम व त्यानुसार व्याजदर आकारण्यात येत. विविध योजनांची यादी तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता.
- मुदत कर्ज योजना
- लघुऋण वित्त योजना
- महिला समृद्धी योजना
- महिला किसान योजना
- बीज भांडवल योजना
लाभार्थी पात्रतेच्या अटी
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदारांचे वय 18 ते 50 वर्ष या दरम्यान असावं.
- अर्जदार हा मातंग समाजाच्या 12 पोट जातीमधील असावा.
- अर्जदाराने निवडलेल्या व्यवसायाबद्दल त्याला संपूर्ण माहिती असावी.
- महामंडळाकडून देण्यात आलेल्या अटी व शर्ती अर्जदारांनी नियमित पाळाव्यात.
- अर्जदारांनी महामंडळाकडून किंवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमामध्ये आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदारांचा वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावं.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे ?
- उत्पन्नाचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- रेशन कार्ड
- शैक्षणिक कागदपत्र
- आधार कार्ड
- मोबाईल क्रमांक
- व्यवसाय करत असलेल्या जागेचा पुरावा
- प्रतिज्ञापत्र
अर्ज कुठे करावा ?
अर्ज करण्यासाठी एका लाभार्थ्यास एकच कर्ज मागणी अर्ज देण्यात येईल. अर्जदारांना संबंधित जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील गरजू व्यक्तींनी विहित नमुन्यातील अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात स्वतः जाऊन जमा करावा लागेल. संपर्क कार्यालय जिल्हा व्यवस्थापक सर्व जिल्हे
महामंडळ कर्ज योजना अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
नमुना अर्ज – 01 पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
नमुना अर्ज – 02 पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
शासन निर्णय पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |