Pandharpur Vitthal Darshan Maharashtra 2023 : विठोबाची वारी सुरू झालेली आहे, महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा विठोबाच्या वारीचा व दर्शनाचा ध्यास घेतलेला आहे. अद्याप महाराष्ट्रातील पेरण्या पावसाभावी आटोपल्या नाहीत; म्हणून शेतकरी वारीला निघालेला आहे, वारी संपली की, शेतकरी पेरणीलाकडे वळला म्हणून समजा. मागील दोन वर्षाचा विचार केला, तर कोरोनाच्या वाईट काळामध्ये शेतकऱ्यांना वारी करता आलेली नाही; परंतु यंदा शेतकरी वारी करेल, तीसुद्धा मोफत कारण राज्यात शिंदे-फडणवीस नवीन सरकार आल्यानंतर शेतकरी, वारकऱ्यांसाठी, जनसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत.
राज्यशासनाकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास व महिलांसाठी अर्धे तिकीट योजना राज्यात सुरु करण्यात आली, त्यामुळे यंदाची वारी व विठ्ठलाच दर्शन जनसामान्य नागरिक व महिलांसाठी जवळजवळ मोफतच होणार आहे. 29 जून रोजी आषाढी एकादशी आहे, 23 जूनपासूनच पंढरपूरसाठी गर्दी उसळण्यास सुरुवात होईल, याचा विचार करून महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जास्तीच्या बसेसचे नियोजन केले आहे.
29 जूनला आषाढी एकादशी : दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा 29 जूनला आषाढी एकादशी आलेली आहे. यानिमित्ताने पंढरपुरामध्ये मोठी जत्रा भरवली जाते. 29 जूननंतर काही दिवस गर्दी कायम राहणार, त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत जास्तीच्या बसा सोडल्या जातील. याचा मुख्यत्वे फायदा ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
75 पेक्षा जास्त वयाच्या भक्तांना मोफत प्रवास : काही दिवसापूर्वी म्हणजेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाकडून 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा सुरू करण्यात आली. अशी योजना राज्यात राबविण्यात येत असलेली ही पहिली आषाढी एकादशी आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना वर्षापेक्षा यावर्षीची आषाढी एकादशी मोफत प्रवासाची, खूपच वेगळी व किफायतशीर ठरणार आहे.
23 जूनपासून विशेष सेवा : 29 जूनला आषाढी एकादशी असली, तरी विठोबाशी असलेला जिव्हाळा पाहता, त्यापूर्वीच वारकरी वारीला जाण्यासाठी पंढरपूरच्या दिंडीत, जत्रेत सहभागी होतात. त्यामुळे राज्य महामंडळाकडून 23 जूनपासूनच या विशेष सुविधा सुरू करण्यात येतील.
प्रवासात महिलांना 50% सूट : महिलांसाठी राज्य शासनाकडून महिला सन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत महिलांना महाराष्ट्रात कुठेही प्रवास करताना प्रवासात 50 टक्के सूट दिली जाते. त्यामुळे यंदाच्या पंढरपूर वारीत महिलांना कमी खर्चात विठ्ठलाच दर्शन करता येणार आहे. शासनाच्या या तिकीट दर कमी करण्याच्या योजनेमुळे यंदाच्या वारीमध्ये महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.