उर्वरित नुकसान भरपाई रक्कम लवकरच मिळणार; शेतकऱ्यांना ekyc करावी लागेल : Nuksan Bharpai

राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेला होत. नुकसान झालेल्या अश्या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अखेर राज्यशासनाकडून मदत वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अद्याप वाटप न झालेल्या अनुदान संदर्भातील ही महत्त्वपूर्ण घोषणा राज्यशासनाकडून करण्यात आली.

1500 कोटी रु. नुकसान भरपाई

सतत पडणारा पाऊस (संततधारा) नैसर्गिक आपत्ती म्हणून राज्यशासनाकडून अधिकृतरित्या मान्यता देण्यात आली, ज्यामुळे यासाठी मदतीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 14 जिल्ह्यातील २७ लाख शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांच वितरण केलं जाणार आहे.

📢 PM किसान योजना १४ वा हफ्ता या दिवशी मिळणार ! पहा संपूर्ण माहिती

याचप्रमाणे 2023-23 मध्ये अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या घटना समोर आलेल्या होत्या, यासाठीसुद्धा राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 401 एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याव्यतिरिक्त राज्यात झालेल्या अमरावती, औरंगाबाद व पुणे जिल्ह्यातील काही भागात 04 मार्च ते 17 मार्च गारपिटासह अवकाळी पावसासाठी 177 कोटी रुपयांची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे.

वरील सर्व नुकसान भरपाई संदर्भात निधी मंजूर होऊनसुद्धा शेतकऱ्यांना अद्याप मदतीची रक्कम वाटप करण्यात आलेली नव्हती, यामागचा मुख्य कारण म्हणजे जानेवारी 2023 पासून नुकसान भरपाई वाटप संदर्भात काही नियमात बदल करण्यात आले. यातील महत्त्वपूर्ण बदल म्हणजे नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना ekyc करावी लागेल, त्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यावरती DBT प्रणालीद्वारे वितरित करण्यात येईल.

नुकसान भरपाई कधी मिळणार ?

संबंधित जिल्ह्यातील नुकसान भरपाईच्या व सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या अधिकाऱ्यांकडून तयार करून पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेल्या आहेत, लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आल्यानंतर त्यांच्या संबंधित ग्रामपंचायतवर याद्या प्रसिद्ध करण्यात येतील, यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना जवळील महा-ई-सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रावर जाऊन ई-केवायसी करावी लागेल, त्यानंतर काही दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येईल.

3 thoughts on “उर्वरित नुकसान भरपाई रक्कम लवकरच मिळणार; शेतकऱ्यांना ekyc करावी लागेल : Nuksan Bharpai”

Leave a Comment