केंद्रशासनामार्फत 17 सप्टेंबर 2023 पासून संपूर्ण देशभरात पीएम विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली. सदर योजना सुरू करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे विश्वकर्मा समाजातील विविध कारागिरांना व्यवसायासाठी सवलतीच्या दरात लोन उपलब्ध करून देणे हा होय. आता मोदी शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या विश्वकर्मा योजनेतून 3 लाख रु. पर्यंतच्या लोनवर 8% सबसिडी दिली जाणार आहे. या लोनसाठी फक्त 5% टक्के व्याजदर आकारला जाईल.
Vishwakarma Scheme Loan Application
विश्वकर्मा योजनेची व्याप्ती आता वाढवण्यात आलेली असून या योजनेचा समावेश PIDF अंतर्गत करण्यात आला आहे. PIDF म्हणजेच पेमेंटस् इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड याअंतर्गत विश्वकर्मा योजना समाविष्ट करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे विश्वकर्मा योजनेचा कालावधी दोन वर्षांनी वाढविण्यात आला आहे.
यापूर्वी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेला PIDF अंतर्गत समाविष्ट करण्यात आलं होतं. ज्याचा फायदा देशातील बहुतांश छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी घेतला. 2021 ते 2023 या कालावधीत 2.66 कोटी नवीन टच पॉइंट पीएम स्वानिधी योजनाअंतर्गत करण्यात आले आहे.
Vishwakarma Loan Scheme साठी असा करा अर्ज
PIDF ची मर्यादा वाढवून आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे, यामुळे या योजनेअंतर्गत विश्वकर्मा समाजातील कारागीर नागरिकांनी 3 लाख रुपयापर्यंत लोन मिळवण्यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पीएम विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा पोर्टल सुरू करण्यात आलेला असून तुम्ही खाली लिंकवर क्लिक करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.
PM विश्वकर्मा योजनेची संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा