ITI Stipend : आयटीआय शिकताय महिन्याला मिळणार 500 रु. विद्यार्थ्यांसाठी शासनाचा महत्त्वकांक्षी निर्णय

ITI Stipend : शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी सतत नवनवीन शिष्यवृत्ती व मानधन योजना राबविण्यात येतात. आयटीआय शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून नुकतीच एक घोषणा करण्यात आलेली आहे. ज्याअंतर्गत दरमहा 40 रु. असणार मानधन थेट 500 रु. इतकं वाढविण्यात आलं आहे, यासंदर्भातील थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

ITI Stipend Scholarship

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, अल्पसंख्यांक समाज त्याचप्रमाणे खुल्याप्रवर्गातील आर्थिक मागास घटकांतर्गत मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी औद्योगिक प्रशिक्षण संस्थाअंतर्गत प्रशिक्षण घेत असल्यास मासिक फक्त 40 रुपये विद्यावेतन किंवा मानधन दिल जायचं.

परंतु आता मानधनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आलेले असून आता यापुढे आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 500 रुपये इतका मानधन दिल जाणार आहे. हा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला, असून लवकरच यासंदर्भातील शासन निर्णय (GR )प्रसिद्ध करण्यात येईल.

सर्वांचा आता 500 रु. विद्यावेतन

यापूर्वी फक्त अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना 500 रुपये विद्यावेतन दिल जात होतं. त्याचप्रमाणे एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 60 रु. तर ओबीसी व इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 40 रुपये इतकं मानधन दरमहा शासनाकडून दिल जायचं. आता सर्वच प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 500 रुपये दरमहा देण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय शासनाकडून नुकताच घेण्यात आलेला आहे.

📣 या विद्यार्थ्यांना दरवर्षी 7,500 रु. मिळणार !

शासकीय आयटीआयमध्ये शिक्षणाचा खर्च खूपच कमी आहे. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणासाठी शहरी भागाकडे येतात. त्यांना दरमहा 500 रुपयांच मानधन किंवा विद्यावेतन मिळाल्यास शिक्षणासाठी नक्कीच मदत होईल. हाच हेतू बाळगून शासनाकडून विद्यावेतनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे.

या दिवसापासून विद्यावेतन वाढणार

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा विद्यावेतन मागील 40 वर्षापासून फक्त 40 रुपये एवढाच होता. वाढती महागाई पाहता चाळीस रुपये खूपच कमी विद्यावेतन आहे आणि या विद्यावेतनामध्ये वाढ करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून वारंवार केली जात होती, दरम्यान राज्यमंत्रिमंडळाने त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला असून सप्टेंबर महिन्यापासून सदर निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

कोणाला मिळणार लाभ ?

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व भटक्या जमाती त्याचप्रमाणे इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक समाज आणि खुल्याप्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांना सदर वाढीव विद्यावेतनाचा लाभ मिळणार आहे. काही महत्त्वाच्या अटी व शर्ती विद्यार्थ्यांना लागू असतील त्यानंतरच विद्यावेतन दिलं जाईल.

विद्यावेतनासाठी अर्ज कसा करावा ?

संबंधित विद्यार्थ्याला विद्यावेतन मिळवण्यासाठी संस्थेमध्ये अर्ज करावा लागेल. त्या अर्जाची छाननी संस्थेच्या कर्मचाऱ्याकडून केली जाईल. अर्जाची छाननी झाल्यानंतर पालकांची आर्थिक उत्पन्नाची पाहणी, त्याचप्रमाणे इतर दस्तवज तपासणी करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना मानधन मंजूर केले जाईल, त्या विद्यार्थ्यांसाठी पैशाची मागणी कोषागाराकडे करावी लागेल, तेथून पैसे आल्यानंतर विद्यार्थ्यांना दिले जातील.

विद्या वेतनासह इतर व्यवस्था

शासनाने विद्यार्थ्यांसाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत, ज्यामध्ये निवासाची व्यवस्था, वाचण्यासाठी ग्रंथालय, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना इत्यादी लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यात आता विद्यावेतनामध्ये वाढ करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

Leave a Comment