HDFC Scholarship 2023 : 1ली ते पदवीधारक विद्यार्थ्याना मिळणार 75,000 रु. स्कॉलरशिप; येथे करा ऑनलाईन अर्ज

HDFC Scholarship 2023 : दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जणू एक वरदानच आहे; कारण वंचित गटातील असल्यामुळे अशा प्रवर्गातील उमेदवारांना शिक्षण घेणे थोडं बेताचच; म्हणून शासनाकडून दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या. शासनासोबतच विविध मंडळ, संस्था इतकच काय तर बँकांनीसुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. आज आपण एचडीएफसी बँकेमार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या HDFC Scholarship बद्दल जाणून घेणार आहोत.

HDFC Bank Parivartan ECS Scholarship

एचडीएफसी बँकेकडून विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची खास योजना सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जवळपास 75,000 रुपयापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार असून ही शिष्यवृत्ती एचडीएफसी बँक ECSS परिवर्तनाचा 2023-24 चा कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येत आहे.

या शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश म्हणजे दुर्बल वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने त्यांना पुढील शिक्षण घेता येत नाही; परिणामी पैशाअभावी अनेकांना शिक्षणापासून मुकावं लागतं. हाच उद्देश समोर ठेवून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा आर्थिक लाभ मिळावा. म्हणून एचडीएफसी बँकेकडून एचडीएफसी स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली.

स्कॉलरशिप रक्कम किती मिळणार ?

  • इयत्ता 1ली ते 6वी वर्गातील विद्यार्थ्यांना – 15,000 रु.
  • इयत्ता 7वी ते डिप्लोमा, आयटीआय, पॉलिटेक्निक या अभ्यासक्रमासाठी – 18,000 रु.
  • सामान्य पदवी अभ्यासक्रमासाठी – 30,000 रु.
  • सामान्य पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी – 35,000 रु.
  • व्यवसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी – 75,000 रु.

शिष्यवृत्तीसाठी लागणारी पात्रता

एचडीएफसी बँकेकडून राबविण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थी किमान इयत्ता पहिली ते बारावी, पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा, आयटीआय किंवा पॉलिटेक्निक अभ्यासक्रमामध्ये खाजगी शासकीय किंवा निमशासकीय अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेत असणे आवश्यक आहे.

अर्जदारांनी मागील वर्षी किमान 55% सह परीक्षा उत्तीर्ण असावी. त्याचप्रमाणे पात्र अर्जदारांच्या कुटुंबातील एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावा. अर्ज करत असताना अर्जदारांना संबंधित आवश्यक कागदपत्र लागतील ही बाब लक्षात ठेवावी.

आवश्यक कागदपत्र कोणती ?

  • विद्यार्थ्यांचा आधार कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट आकारांचे फोटो
  • विद्यार्थ्यांचा प्रतिज्ञापत्र
  • कौटुंबिक/वैयक्तिक संकटाचा पुरावा
  • सध्यास्थितीत प्रवेश घेतलेल्या शिक्षण संस्थेचा प्रवेश पुरावा (शुल्क पावती/ओळखपत्र/बोनाफाईड प्रमाणपत्र इत्यादी)

शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

  • विद्यार्थ्यांना एचडीएफसी स्कॉलरशिपचा लाभ मिळवण्यासाठी सर्वप्रथम buddy4study.com या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • वेबसाईटवर आल्यानंतर विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी टाकून नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी केल्यानंतर होम पेजवर Scholarship या ऑप्शनवर क्लिक करून उजव्या बाजूला Featured Scholarship मधून ” HDFC Bank Parivartan’s ECSS Programme” या ऑप्शनवरती क्लिक करा.
  • त्यानंतर नवीन पेज उघडेल त्याठिकाणी Apply Now या बटनावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर अर्ज भरण्यासाठी अर्जाचा मुख्य नमुना दिसेल, त्यामध्ये विद्यार्थ्यांची विचारलेली सर्व मूलभूत माहिती भरून घ्या.
  • मूलभूत माहिती भरल्यानंतर आवश्यक ती कागदपत्र त्याठिकाणी अपलोड करावी लागतील. योग्य त्या प्रमाणात कागदपत्र स्कॅन करून कागदपत्र अपलोड करून घ्यावीत.
  • त्यानंतर सर्व अटी व शर्ती स्वीकारा या बटणावरती क्लिक करून तुमचा अंतिम अर्ज सबमिट करा.

अशाप्रकारे तुम्ही एचडीएफसी बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या “एचडीएफसी बँक परिवर्तन प्रोग्रामसाठी” ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. जर विद्यार्थी पात्र असेल व एचडीएफसी बँकेच्या निकषांमध्ये बसत असेल, तर संबंधित विद्यार्थ्यांना संपर्क करून पुढील स्कॉलरशिपची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

HDFC स्कॉलरशिप ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment