Crop Insurance : आज दिनांक 30 मे 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या हितार्थ दोन महत्त्वाचे असे मोठे निर्णय घेण्यात आलेले असून या दोन्ही योजनेला मंत्रिमंडळातून मंजुरी मिळालेली आहे. ऐन खरीप हंगामाच्या पुढे शासनाकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे.
मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या दोन योजनांपैकी पहिली योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना – ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना आता वार्षिक 6 हजार रुपये ऐवजी 12 हजार रुपये मिळणार आहेत.
राज्यात आजपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत करण्यात आली. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आलेली होती, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली.
आज मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आलेली दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) एक रुपयात. दरवर्षी शेतकऱ्यांमार्फत खरीप व रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतर अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती इत्यादी बाबीपासून आपल्या पिकाच संरक्षण व्हावं व परतीचा मोबदला मिळावा म्हणून पीक विमा भरला जातो. परंतु यामध्ये आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने बहुतांश शेतकरी पिक विमा भरत नाही. हा विचार करून शासनाकडून आता पिक विमा नोंदणी फक्त 1 रुपयात करता येणार आहे.
आजच्या मंत्रिमंडळातील महत्वपूर्ण निर्णय : 👇
- कामगाराची सुरक्षा, त्यांचे आरोग्य, कामाची स्थिती याबाबत नवीन कामगार नियमांना मान्यता (कामगार विभाग)
- केवळ 01 रुपयात शेतकऱ्यांना पिक विमा भरता येणार; शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! (कृषी विभाग)
- महासन्मान निधी योजना राज्यात राबविणार; पीएम किसान योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधार करण्यात येणार (कृषी विभाग)
- सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र उभारण्यात येणार; 22.18 कोटीची मान्यता (कृषी विभाग)
- महिलांना पर्यटन व्यवसायात अधिक वाव देण्यासाठी महिलांना महिला केंद्रित पर्यटन धोरण (पर्यटन विभाग)

ई-केवायसी नाही केल्यास, पुढील हफ्ता मिळणार नाही (पीएम किसान & नमो शेतकरी योजना)