Central Railway Recruitment 2023 : मध्य रेल्वे (महाराष्ट्र) अंतर्गत 10वी पास+ITI उमेदवारांसाठी मेगाभरती; एकूण 2409 रिक्त जागा

Central Railway Recruitment 2023 : मध्य रेल्वे (महाराष्ट्र) विभागात विद्यार्थ्यांसाठी मेगाभरती सुरू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावी + ITI केला असेल, त्यांच्यासाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेमध्ये शिकाऊ पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केलेली असून अर्ज भरण्याची प्रक्रिया 29 ऑगस्ट 2023 पासून सुरू झालेली आहे. सदर भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2023 देण्यात आलेली आहे.

🔔 पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

🔔 एकूण पदसंख्या : 2409 जागा

विभागानुसार पदसंख्या : खालीलप्रमाणे 👇

  • मुंबई – 1649
  • भुसावळ – 296
  • पुणे – 152
  • नागपूर – 114
  • सोलापूर – 76

📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांसाठीची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇

पदनामशैक्षणिक अर्हता
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)(i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स)

💁 वयाची अट : 29 ऑगस्ट 2023 रोजी 15 ते 24 वर्षे (/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

💸 अर्जासाठी शुल्क : जनरल/ओबीसी/100/- (एससी/एसटी/अपंग/महिला – फीस नाही)

💰 पगार/वेतनश्रेणी : निवड करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांना नियमानुसार वेतनश्रेणी देण्यात येईल.

💁 निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड आयटीआयमधील एकत्रित गुण, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारावर करण्यात येईल.

✈️ नौकरी ठिकाण : मध्य रेल्वे (महाराष्ट्र)

🌐 अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन

📅 शेवटची तारीख : 28 सप्टेंबर 2023 (05:00 PM)

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
आँनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

how to apply for Central Railway Bharti 2023

  • सदर भरतीकरिता उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा, इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • उमेदवाराची निवड ही ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येईल.
  • ऑनलाइन अर्ज करत असताना सर्व मूलभूत व शैक्षणिक कागदपत्र योग्य त्या फॉरमॅटमध्ये स्कॅन करून अपलोड करावीत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सदर भरतीची संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2023 (05:00 PM) देण्यात आलेली आहे.
  • सदर भरती प्रक्रियासंदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.

Leave a Comment